Skip to content

Extramarital Affair | तीन मुलींना सोडून वडील प्रेयसीसोबत अन् आई प्रियकरासोबत फरार

Extramarital Affair

Extramarital Affair | सध्याच्या काळात नतेसंबंधांमध्ये दुरावा येणे किंवा नाते संपवणे हे प्रकार अगदी सर्रास होताना दिसतात. वाद वाढल्यामुळे किंवा नात्यात असंतुष्ट असल्यामुळे विवाहबाह्य संबंध होतात. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना ही छत्रपती संभाजी नगरमधून समोर आली आहे. आई वडील चक्क आपापल्या प्रेमासाठी पोटच्या तीन लेकींना वाऱ्यावर सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तिन्ही मुलींना घरात सोडून आई वडील आपापल्या प्रेयसी आणि  प्रियकरासोबत फरार झाले आहेत.

या प्रकरणातील आईने दुसरे लग्न केले असून, बापही प्रेयसीसोबत पळून गेला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेला आता झाले आहे. तरीही आपल्या मुलींना बघण्यासाठी अजूनही या दोघांपैकी एकही जण आले नाही. मागील तीन महीने शेजाऱ्यांनी या मुलींना सांभाळले. मात्र, अद्यापही त्यांचे आई-वडील परतले नसल्याने हे प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे. (Extramarital Affair)

Crime News | प्रेयसीच्या अश्लील व्हिडीओचं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं

Extramarital Affair | नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणी राखी व संतोष हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजी नगर येथील एका घरात भाड्याने राहत होते. त्यांना तीन मुली आहेत. मात्र, या दोघांचेही बाहेर विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे या दोघांनाही त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. अनेकदा ते त्यांचय वादांमुळे आपल्या मुलांनाही मारहाण करायचे.

घरात सतत वादग्रस्त वातावरण होते. यानंतर काही दिवसांनी हे दोघेही घर सोडून निघून गेले. आई तिच्या प्रियकरासोबत निघून गेली आणि यानंतर वडील आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी निघून गेले. त्यानंतर आता तीन महीने उंटले असून, अजूनही हे दोघे परतले नाही की, त्यांनी साधी आपल्या मुलांची एकदाही विचारपूस देखील केली नाही. आईवडिलांनी मातृ पितृ धर्म नाही पाळला. पण शेजऱ्यांनी शेजार धर्म पळत या मुलांचा सांभाळ करत आहेत. (Extramarital Affair)

Love Marriage: ‘प्रेम विवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले, सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती समोर

आता तिन्ही मुली बालगृहात

गेल्या तीन महिन्यांपासून आईवडील पसार असून, त्यांचा काहीच पत्ता नाही. तर, आईने दुसऱ्यासोबत लग्न केल्याची माहिती आहे. हे दोघेही तीन महिन्यांपासून घरी आलेले नाही. त्यांनी या तिन्ही मुलांची चौकशीही केली नाही. घरात जे होते नव्हते त्यावर या तिन्ही मुलींनी आपली भूक भागवली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांनी या मुलांना सांभाळले.

मात्र, हे किती दिवस चालणार म्हणून अखेर त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सातारा पोलिसांनी खात्री केली आणि यानंतर हे प्रकरण बाल कल्याण समितीकडे पाठवले. बाल कल्याण समितीने तातडीने या तिन्ही मुलींना छावणीतील विध्यादिप बालगृहात ठेवले असून, या निर्दयी आई वडिलांचा शोध पोलिस घेत आहेत. (Extramarital Affair)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!