Skip to content

Love Marriage: ‘प्रेम विवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले, सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती समोर


Love Marriage: देशात प्रेम प्रकरण वाढत असतांना मोठ्या प्रमाणात त्याचे परिणाम देखील दिसायला सूरवात झाली आहे. बुधवारी एका खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रेमविवाह आणि घटस्फोटावर भाष्य केले. पती-पत्नीमधील वैवाहिक वादाच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी.आर.गवई म्हणाले की, प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. (Love Marriage)

Sarkari Naukri 2023: बेरोजगारीची अवस्था! शिपाई पदासाठी बीटेक-एमबीएचे विद्यार्थी

खरे तर न्यायालयात सुनावणी सुरू असताना या जोडप्याने केवळ प्रेमविवाह केला होता. याबाबत वकिलाकडून माहिती घेतल्यानंतर न्यायाधीश गवई यांनी ही टिप्पणी केली. तथापि, ही टिप्पणी न्यायाधीशांची पूर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केली असली मात्र यातील गांभीर्य देखील ओळखणे म्हत्वाचे आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताना पती-पत्नीने मध्यस्थीने वाद मिटवण्याचे निर्देश दिले आहेत.

बार आणि खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे कोर्ट तिच्या संमतीशिवाय घटस्फोट घेऊ शकते. खरेतर, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, लग्न मोडून काढता न येण्याजोगे असल्यास कलम 142 नुसार ते घटस्फोटाचे आदेश देऊ शकते. यामुळे देशातील परिस्थिती किती विदारक बनत चालली आहे याचा प्रत्येय येत आहे. (Love Marriage)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!