Sudhakar Badgujar | नाशकात राजकीय धुमाळी; ठाकरे गटाच्या बडगुजरांना भाजपने घेरलं

0
10
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar | नाशिकमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सत्र सुरूच आहे. त्यातच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी सत्ताधारी शिंदे गटा बरोबरच आता भाजपही मैदानात उतरले असून निवडणुकीआधीच प्रचाराची झलक दिसू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शहरातील  राजकीय वादाचे केंद्र ठरले आहेत. सुरुवातीला शिंदे गटाकडून त्यांना दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात लक्ष करण्यात आले. याच पार्श्वभूमीवरती आता भाजपनेही यात उडी घेतली आहे.

Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

भाजपाकडून बडगुजरांवर आरोप

सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून “आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली” अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामध्ये शहाण्यांनी एका ऑडिओ क्लिपचा आधार घेतला असून त्यामधील एका व्यक्तीने शहाणेंवर आरोप करत धमकी दिली असल्याचे दिसून आले आहे.

“शहाणेंनी आपल्या मित्राला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये केला गेला असून यासंदर्भात आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मित्राने शहाणे यांना फोन करून त्याबाबत जाब विचारला होता. संबंधित व्यक्ती मध्ये मद्यधुंद अवस्थेत होती. या संभाषणाचा ऑडिओ आता समोर आला असून ही ऑडिओ फीत दोन्ही घटकांकडून समाज माध्यमांवर वायरल करण्यात आली आहे. या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये संबंधित व्यक्तीने आपल्या मित्राच्या आत्महत्येला माजी नगरसेवक शहाणे कारणीभूत आहेत असा जाब विचारला आहे. यावेळी भाजप नेत्यांने “तू बडगुजर यांचा माणूस आहे का?” अशी विचारणा केली. त्यामुळे या कॉलचा आधार घेत शहाणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime | बडगुजरांचा मुलगा फरार; ‘त्या’ प्रकरणी मुलाला अटक होणार…?

बडगुजर यांचे शहाणेंना आव्हान

मुकेश शहाणे यांनी केलेल्या या आरोपांनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देखील पत्रकार परिषद घेत शहाणेंना आव्हान दिले आहे. सध्या गाजत असलेल्या प्रशांत जाधव प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीने मोर्चा काढत शहाणेंना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शहाण्यांनी घाबरून हा आरोप केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याचे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राजकारण चांगलंच रंगताना दिसतंय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here