Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या कार्यकर्त्यांची कमाल; क्रेन आणि मोठ्या पुष्पहारने केले जंगी स्वागत

0
34
#image_title

Sanjay Shirsat | राजकारणात राहण्यासाठी नेते कायमच चार पावले पुढच्या विचाराने वागत असतात. पण त्यांचे उत्साही कार्यकर्ते आपल्या आवडत्या नेत्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. अशाच एका अजब प्रकाराने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. नुकतेच सिडकोच्या अध्यक्षपदाची विराजमान झालेले शिंदे गटाचे धडाकेबाज प्रवक्ते संजय शिरसाटांचे त्यांच्या हौशी कार्यकर्त्यांकडून आपला नेता मंत्री नाही तर मोठ्या महामंडळाचा अध्यक्ष झाल्याच्या आनंदात जंगी स्वागत केले गेले. ज्यामुळे सिडकोच नाही तर अख्खी प्रशासकीय यंत्रणात आवाक झाली.

Sanjay Shirsat | “ते पावसात भिजतायत, आम्हालाही शॉवर लाऊन भाषणं करावी लागतील; शिंदे गटाचा सणसणीत टोला

कार्यकर्त्यांनी दीड महिने आधीच आटोपली दिवाळी

संजय शिरसाटांच्या कार्यकर्त्यांनी भल्या मोठ्या क्रेन सोबत दीडशे ते पावणे दोनशे किलोचा फुलांचा हार आणि फटाक्यांसहीत अख्खं बेलापूर दणाणून सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधील सर्व मंत्र्यांमध्ये वजन असलेल्या बाजीराव चव्हाण या कार्यकर्त्याने आमदार शिरसाटांचे जंगी स्वागत केल्याचे सांगितले जात असून सिडको कार्यालयात शिरसाटांची एंन्ट्री दणक्यात थाटात झाल्याचे दिसून आले.

मंत्रीपद न मिळाल्याने होते नाराज

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची साथ सोडून केलेल्या बंडानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट शिंदेंच्या पाठी खंबीरपणे उभे होते. परंतु मंत्रीपद हुकल्याने नाराज असल्याचेही बोलले जात होते. पण आता विधानसभा निवडणूक तोंडावरती असतानाच त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदाची वर्णी लागली आहे. तेव्हा त्यांना सिडको महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जाते आहे.

गुरुवारी स्वीकारला अध्यक्ष पदाचा पदभार

आमदार संजय शिरसाटांनी गुरुवार दि. 19 रोजी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा ते बेलापूर इथल्या सिडको भवनात आले असता त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. यामध्ये मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. कार्यकर्त्यांनी क्रेनने मोठा पुष्पहार देखील आणला होता. यासोबतच संजय शिरसाठ यांच्या स्वागताला जोरदार बॅनरबाजी देखील केली गेली. कार्यकर्त्यांवर जेसीबीतून फुलांची उधळण करण्याची पद्धत मुख्यतः ग्रामीण भागात दिसून येते. परंतु संजय शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांनी ही पद्धत थेट नवी मुंबईत आणली. एवढेच काय तर आमदार शिरसाटांना शुभेच्छा देण्यासाठी आणलेला भला मोठा पुष्पहार आणि बॅनर लावण्यासाठी क्रेन चक्क सिडको भावनात आणली गेली होती.

शिरसाठ यांच्या गळ्यात मला मोठा पुष्पहार क्रेनच्या मदतीने घालण्यात आला. त्यानंतर सिडको प्रशासनानं त्यांचा तुतारी वाजवून व औक्षण करून स्वागत केलं. त्याचबरोबर शिरसाटांना सिडको भवनाच्या दालनापर्यंत नेण्यासाठी फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. तेथे देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. गर्दीमुळे सिडको भवनाची सर्व प्रवेशद्वारे खुली करण्यात आली होती. तेव्हा यावेळी आमदार शिरसाटानी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचे निदर्शनास आले.

Political News | ‘…तर शिवसैनिक आत्महत्या करतील’; शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाजीराव चव्हाण नेमके कोण? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये बाजीराव चव्हाणांचा धबधबा असल्याचे सांगितले जाते. तसेच आमदारच नव्हे तर कॅबिनेट मंत्र्यांकडूनही बाजीराव यांच्या शब्दाला मान असल्याचे बोलले जाते. तेव्हा बाजीराव प्रशासकीय वर्तुळातही पडद्यामागून मोठी ताकद लावत असल्याच्या चर्चांना उधाण आले असून एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे पदाधिकारी असलेले बाजीराव मराठवाड्यातून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here