Sudhakar Badgujar | नाशिक जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणास्तव चर्चेत राहीला आहे. यातच नुकतंच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात नाशिकचे उबाठा गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला. यातच सूधाकर बडगुजर यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महापालिकेच्या कंत्राटात अपहार केला असल्य़ाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तर नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बडगुजर यांचा अटी-शर्थीेनी अटकपूर्व जामीन हा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अटकेपासून बडगुजरांची सध्या तरी सुटका झाली असली, तरी सुधाकर बडगुजर यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
Ajit Pawar | अजित दादांना मोठा धक्का!; ‘हा’ बडा नेता ठाकरेंच्या हाती
Sudhakar Badgujar | बडगुजर यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये पार पडलं यावेळी नाशिकचे महानगरप्रमुख सूधाकर बडगुजर यांचा मुद्दा हा फारच गाजला. यातच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत असलेल्या व्हिडीओबरोबरच सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या महापालिकेच्या अपहाराच्या गुन्ह्यामुळे सुधाकर बडगुजर हे एसीबीच्या चांगलेच नजरेत आले आहेत.
सूधाकर बडगुजर यांची २२ डिसेंबर रोजी एसीबी कार्यालयात खुली चौकशी करण्यात आली असता या चौकशी दरम्यान त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर केलीत. दरम्यान, बडगुजर यांनी १० जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत मागितली असून बडगुजर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केलेला होता. या जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली आणि बडगुजर यांनी पोलीस तपासात सहकार्य करावे तसेच इतर काही अटी-नियमांनुसार बडगुजर यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात
काय आहे नेमकं प्रकरण ?
सूधाकर बडगुजर हे नाशिकचे उबाठा गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर असून तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माजी नगरसेवक बडगुजर यांच्याविरुद्ध २०१६ साली तक्रार अर्ज दाखल केला होता. तेव्हापासूनच नाशिकच्या ‘एसीबी पथकाकडून बडगुजर यांची अपहारासंदर्भात खुली चौकशी सुरू असताना या चौकशीच्या शेवटी बडगुजर यांच्यासहीत संशयित साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश चव्हाण यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध या अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणात बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मिळाला असला, तरीही बडगुजरांची पोलिसांकडून चौकशी मात्र पुढे सुरू राहणार आहे. यासह सलाीम कुत्ता पार्टी प्रकराणात पुढे आणखी काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम