Skip to content

Suchana Seth | बाप-लेकाची भेट होऊ नये म्हणून, आईनेच चिमूरड्याला संपवले

Suchana Seth

Suchana Seth |  आई मुलासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते अशा घटना तुम्ही ऐकल्या असतीलच पण आईनेच पोटच्या गोळ्याला संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बंगळुरू येथे स्थित असलेल्या ‘माईंडफुल एआय लॅब’ नामक एका आर्टिफिशिअल इंटेलिजन्स AI कंपनीच्या सीईओ असलेल्या सूचना सेठ (Suchana Seth) हिने आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या करत त्याला पिशवीतून नेत असताना ह्या खूनी आईला ताब्यात घेण्यात आले आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे हिला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. यामागे आपल्या घटस्फोटित पतीसह मुलाची भेट होऊ नये म्हणून, ३९ वर्षीय सूचनाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

 Suchana Seth | कोण आहे आरोपी सुचना सेठ ?

“AI एथिक्स लिस्ट मधील १०० ब्रिलियंट वूमन” या यादीत सूचना सेठ (Suchana Seth) हीचा समावेश आहे. सुचनाला १२ वर्षांचा AI नीतिशास्त्र तज्ञ व डेटा सायंटिस्टचा अनुभव आहे. ती डेटा सायन्स टीम्सला आणि स्टार्टअप्सला आणि मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम करते. तर, तिने लिंक्ड इन अकाऊंट वर मेन्शन केल्याप्रमाणे तिच्याकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तसेच टेक्स्ट मेलिंग या क्षेत्रातील चार अमेरिकन पेटंट्सदेखील आहे. तर, ती खगोल भौतिकशास्त्रासह प्लाझ्मा फिजिक्समध्ये पारंगत आहे. यासोबतच तिने संस्कृतमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा घेतलेला आहे.

Latur Crime | जिगरी मित्रच निघाला आईचा प्रियकर; म्हणुन झोपेतच संपवले

नेमकं प्रकरण काय..? 

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘माईंडफुल एआय लॅब’ या कंपनीची सीईओ असलेली सूचना सेठ (Suchana Seth) हीने आपल्या घटस्फोटीत पतीने मुलाला पाहूही नये, यासाठी मुलाला गोव्याला घेऊन जाण्याचा प्लॅन केला. दरम्यान, तिने गोवा येथे थांबलेल्या एका हॉटेलच्या रूममध्येच पोटच्या मुलाला संपवले. येताना ती मुलासोबत आली होती. मात्र, हॉटेलमधून निघताना ती एकटीच बाहेर पडली. यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तिच्यावर संशय आला.

यावेळी त्यांनी तिला विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कर्मचारी जेव्हा रूममध्ये साफ सफाई साठी गेले. तेव्हा समोरील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना त्या खोलीत रक्ताचे डाग होते. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकांनी पोलिसांना कळवले. (Suchana Seth)

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

पोलिसांनी असा सापळा रचत केली अटक 

ज्यावेळी पोलिसांना कळवले गेले, त्यावेळी आरोपी महिला ही टॅक्सीने प्रवास करत होती. पोलिसांनी संबंधित टॅक्सी चालकाला संपर्क केला. त्याला प्रकरण सांगितले आणि तिला जवळील पोलिस ठाण्यात नेण्यास कळवले. त्यानुसार टॅक्सी चालकाने आरोपी सूचना हीला कर्नाटक येथी चित्रदुर्ग येथील पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, यावेळी ती ज्या टॅक्सीतून प्रवास करत होती. त्यात पोलिसांना तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. अशा प्रकारे आरोपी सूचना सेठ हीला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. (Suchana Seth)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!