Skip to content

Deola | व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद पत्रकारांमध्ये – सपोनि दीपक पाटील

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आज सर्वच क्षेत्रातील व्यवस्था ढासळतांना दिसून येत असून, त्या व्यवस्थेविरुद्ध पत्रकार लढतांना दिसून येत आहेत आणि ती व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद खऱ्या अर्थाने पत्रकारांमध्ये असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे. (दि. ६) जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून देवळा येथे सोमवारी (दि ९) रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार दिन व पत्रकार गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नितीन शेवाळकर हे होते.(Deola)

यावेळी सपोनि पाटील म्हणाले कि, राष्ट्रनिर्मितीत पत्रकारांचे मोठे योगदान असून, अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत आहेत. पत्रकारांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. एखादा पोलीस अधिकारी असो राजकीय व्यक्ती असो किंवा एखादा समाजकंटक असो तो जेव्हा वाईट करायला विचार करतो तेव्हा त्याच्या बाजूने पत्रकार गेला तर तोदेखील घाबरतो हि ताकद पत्रकाराची आहे. एखादी बातमी मिळविण्यासाठी पत्रकारची तळमळ का असते हे मी जवळून बघितले. त्यामुळे मी स्वतः बातमी देण्यासाठी इच्छुक असतो. मात्र, एखाद्या घटनेमुळे कायदा सुव्यस्था ढासळू नये याची खबरदारीही पत्रकारांनी घेतली पाहिजे, असे यावेळी त्यांनी सांगितले.(Deola)

Deola | देवळा येथील आहेर महाविद्यालयात ‘आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा’

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रा. गोरख निकम, नितीन शेवाळकर, अविनाश महाजन, वसंत रौंदळ, संजय देवरे, राजपाल अहिरे, वैभव पवार, खंडू मोरे, अनिल सावन्त आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकारांचा पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, रविराज बच्छाव, बापू देवरे, ज्योती गोसावी, राहुल शिरसाठ, यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.(Deola)

यावेळी सोमनाथ जगताप, महेश सोनकुळे, बाबा पवार, विनोद देवरे, पंडित पाठक, देविदास बोरसे, दिनेश सोनार, भिला आहेर, योगेश सोनवणे, महेश शिरोरे, शरद पवार, राकेश आहेर, भगवान देवरे, संदीप देवरे, संजय देवरे, दादाजी हिरे, विश्वास पाटील, माधव शिरसाठ, महादू मोरे, एकनाथ सावळा, वैभव केदारे, दिनकर आहेर, जगदीश निकम, नामदेव थोरात, राकेश शिवदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.(Deola)

Deola | ‘मविप्र’ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत पिंपळगाव विद्यालयाचे यश…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!