Skip to content

Deola | वाखारी येथे जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हरी कीर्तन सोहळा संपन्न

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील वाखारी येथे आज मंगळवार (दि. ९) रोजी संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वाखारी (ता. देवळा) येथील तैलिक समाज बांधवानी श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी संपूर्ण वाखारी गावातून टाळ मृदूंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली.(Deola)

Deola | व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद पत्रकारांमध्ये – सपोनि दीपक पाटील

यासोबत, हरी कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच यावेळी ठिकठिकाणी श्री. संताजी महाराज जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे महिला भगिनींनी औक्षण केले आणि यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी पंढरीनाथ जाधव, भिका सोनवणे, संभाजी शेजवळ, नामदेव जाधव, भाऊसाहेब जाधव, वसंतराव जाधव, नंदू जाधव, मधुकर जाधव, बापू जाधव आदी समाज बांधव आणि वखारी गावचे ग्रामस्थ हे यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!