Skip to content

ठेकेदाराने केलेल्या मारहाणप्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन


नाशिक :  नाशिक शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्यांना देण्यात आलेली आहे, त्या वॉटरग्रेसच्या ठेकेदाराने सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप अन्य सफाई कर्मचाऱ्यांनी करण्यात आला असून त्या ठेकेदाराविरोधात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

नाशिक महापालिकेने संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी वॉटरग्रेस या कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला असून सकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंत हे सफाई कर्मचारी शहरात स्वच्छतेचे काम नित्यनियमाने करतात. मात्र, कंपनीच्या ठेकेदाराकडून भरती केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कुठलीही तरतूद नसताना त्यांच्या पगाराची व अन्य रक्कम परस्पररीत्या घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात सदर कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराला याची विचारणी केली असता, त्या ठेकेदाराच्या माणसांकडून मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत वॉटरग्रेस कंपनीचा हा ठेका रद्द करून या ठेकेदाराविरोधात महापालिकेने कारवाई करण्याची मागणी संतप्त कर्मचाऱ्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याजवळ केलेल्या आंदोलनात करण्यात आली आहे. दरम्यान, जर या मागणीची पूर्तता न झाल्यास आणखी दोन दिवस कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांकडून जाहीर करण्यात आले.

कारण आले समोर

महापालिकेकडून वॉटरग्रेसला तीन वर्षांचा ठेका देण्यात आला. या ठेकेदारी माध्यमातून तब्बल ७०० कामगार कार्यरत असून या शहरातील साफसफाईची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, या ठेकेदारांकडून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे कर्मचार्‍यांकडून सागण्यात आले आहे. तसेच महापालिकेकडून कर्मचार्‍यांना मिळणारा १७८०० रुपये पगारामधील ६००० रुपये ठेकेदाराला परत करावे लागत असल्याचे कर्मचार्‍यांकडून सागण्यात आले. तसेच, गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा जो बोनस असतो. तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात न जाता तो ठेकेदाराच्या मुलांच्या अकाउंटला जमा करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून या ठेक्याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलक कर्मचार्‍यांकडून करण्यात आली आहे.

पोलिसांची संशयास्पद भूमिका

दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचारी अमित भालेराव, महिंद्र धिवर, अजय भालेराव व चारु भालेर‍व यांना ठेकेदाराच्या लोकांकडून मारहाण करण्यात आल्याने याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून दखलपात्र तक्रार दाखल न करता सबंधितावर ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त करत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!