नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) येत्या नवरात्रोत्सवात वणी सप्तश्रृंगीगडावर जाण्यासाठी दर ५ मिनिटाला एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दर नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी सप्तश्रृंगीगडावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येत असतात. मात्र यंदा दोन वर्षांच्या निर्बंधानंतर नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून यंदा मंदिर २४ तास खुले असणार आहे.
त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळावी, यासाठी यंदा एसटी महामंडळाने ११० बसेसचे नियोजन केले असून नांदुरी पायथा ते गडावर जाण्यासाठी दर ५ मिनिटाला एसटी बसेसची सुविधा असणार आहे. तसेच वणी सप्तश्रृंगीगडावर जाण्यासाठी नाशिक विभागातून तब्बल २५० बसेस सोडण्यात येणार आहेत.
येत्या २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. जवळपास दाेन वर्षांनंतर भाविकांना सप्तश्रृंगी देवीचे निर्बंधमुक्त दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे यंदा नवरात्राेत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता विश्वस्त समितीसह स्थानिक प्रशासनाकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन व मंदिर विश्वस्त समितीची तयारी पूर्ण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम