Skip to content

ठाकरे गटाची अडचणींत भर ; राऊतांन नंतर सेनेच्या बड्या नेत्यावर अटकेची टांगती तलवार !


महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत. संजय राऊत यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी अखेरच्या दिवशी (28 ऑक्टोबर) चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे.

याप्रकरणी जून महिन्यात मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, या एफआयआरमध्ये पेडणेकर यांचे नाव नव्हते. या प्रकरणी चौकशीअंती चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एक व्यक्ती हा महापौर किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. तसेच एक BMC कर्मचारी आहे, ज्याने आपल्या निवेदनात महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. याप्रकरणी एकूण 9 जणांवर तक्रार करण्यात आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही बाब SRA झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित आहे, दादर परिसरात एका इमारतीच्या विकासकामादरम्यान काही लोकांनी पैसे देऊन फ्लॅट खरेदी केले, मात्र त्यांना फ्लॅट मिळाले नाहीत. ज्या लोकांनी फ्लॅटसाठी पैसे भरले त्यांचा आरोप आहे की हे पैसे बीएमसीचे अधिकारी आणि इमारत बांधकामाशी संबंधित असलेल्या लोकांनी वापरले आहेत.

कायदेशीर सल्ला घेताय पेडणेकर
याप्रकरणी शुक्रवारीही किशोरी पेडणेकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. शनिवारी पुन्हा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी आता पेडणेकर कायदेशीर सल्ला घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी नावे समोर येऊ शकतात. चौकशीत अनेक गोष्टी उघड होत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!