Skip to content

देवळा येथे आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रहारकडून निषेध आंदोलन


देवळा : रविवारी( दि 30) रोजी देवळा येथे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या विरोधात विरोधी प्रहार शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन जोडे चपला मारो आंदोलन करणयात आले.

आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या रवी राणा यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करतांना प्रहारचे कृष्णा जाधव ,संजय दहिवडकर,कुबेर जाधव आदी (छाया – सोमनाथ जगताप )

मदार रवी राणा यांनी अपंगांचे मसिहा शेतकऱ्यांचे नेते आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्या विरोधात खालच्या पातळीवर बेताल वक्तव्य विरोधी प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले .आंदोलनात ओला दुष्काळ जाहीर करावा हि सुद्धा मागणी करण्यात आली .

यावेळी प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष कॄष्णा जाधव, कार्याध्यक्ष दशरथ पुरकर ,तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, उपतालुकाध्यक्ष हरीसिंग ठोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, शेतकरी नेते कुबेर जाधव, व्यंगचित्रकार किरण मोरे, युवा तालुकाध्यक्ष बापू देवरे, जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे ,अपंग क्रांती तालुकाध्यक्ष अर्जुन देवरे ,उपतालुकाध्यक्ष बाळू बैरागी ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनिता देसले ,देवपूरपाडे येथिल यमुनाबाई अहिरे ,मंगलताई वाघ ,रंजना शिरसाठ ,तालुका संघटक माधव शिरसाठ, पोपट मोरे, किरण सोनवणे, सुनील पगार ,कैलास कोकरे, केदा चव्हाण ,सुपडू चव्हाण, आनंदा चव्हाण, रामदास अहिरराव ,बाळू वाघ ,मुकूंद चव्हाण ,सुभाष काळे, पंकज सुर्यवंशी आदीसह अनेक कार्यकर्ते आंदोलन स्थळी हजर होते .पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देण्यात आले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!