द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशकात एका मनोरुग्णाने आपल्याच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या खडक माळेगाव येथे हा प्रकार घडला आहे.
खडक माळेगाव येथे दत्तू सुडके या तरुणाने आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. घरात वाद सुरू असताना दत्तूने रागाच्या भरात वडील रामदास सुडके यांच्या डोक्यात दगड घातला. यामुळे ते जागीच गतप्राण झाले. तर नंतर दत्तूने आईची देखील हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दत्तू हा मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी दत्तूला अटक केली असून, अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत बऱ्याच हत्येच्या घटना घडल्याने महाराष्ट्र हादरून निघाला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील मागील 2 ते 3 महिन्यात हत्येच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यात हा सुरू असलेला एक प्रकारचा रक्तपात कधी थांबेल असा सवाल नागरिक करत होते. आता खडक माळेगाव येथे घडलेल्या या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम