Skip to content

एकनाथ शिंदेंसोबतच्या त्या आमदारांचा फोटो आला समोर; आमदार बच्चू कडू यांचाही समावेश


द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये जवळपास 25 हुन अधिक आमदारांसह गेले होते. आता ता बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर आला आहे.

आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण कोण आहेत, असे स्पष्ट होत नव्हते. मात्र आता चित्रात एकनाथ शिंदे यांच्यासह प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल हे देखील दिसून येत आहेत. हॉटेलमध्ये त्यांचा हा फोटो असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा केला होता. या फोटो मध्ये प्रहार संघटनेचे दोन आमदार दिसून येत आहेत. आणि इतर 33 असे एकूण 35 आमदार शिंदे यांच्यासोबत छायाचित्रात दिसुन येत आहे.

या आमदारांना शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. तर पुढचा काळ हा आमचाच, लहान पक्षांचा असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू हे देखील या फोटोत दिसून येत असल्याने, ते देखील नाराज आहेत का? आणि नाराज आहेत तर नेमके कशामुळे? असे सवाल उपस्थित होत आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री हे सर्व आमदार गुवाहाटी येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुढे काय चित्र दिसते हे लवकरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!