Skip to content

आयपीएल विजेता गुजरात टायटन्सने शुभमनला दिला नारळ… खरंच !


मुंबई – गुजरात गुजरात टायटन्स संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या शुभमन गिलबाबत संघाने असे ट्वीट केले होते, की यामुळे क्रिकेटचाहत्यांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यावर अखेर संघाकडून स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम देण्यात आले.

झाले असे की, गुजरात टायटन्सने शुभमन गिलला टॅग करून एक ट्वीट केले, ज्यात त्यांनी लिहिले की, ‘तुझा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.’ शुभमन गिलने हार्ट इमोजीसह हे ट्वीट रिट्विटही केले होते. त्यामुळे सर्वांनाच असे वाटले की, गिलने गुजरात संघ सोडला, की संघाने त्याला रिलीज केले. तसेच तो दुसऱ्या संघात जाणार, यावरून अनेक चर्चा झाल्या होत्या.

मात्र, काही तासांनी पुन्हा एक ट्वीट करत ह्यावर स्पष्टीकरण दिले. गुजरात संघाने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, शुभमन हा आमच्या संघाचा भाग असल्याचे म्हणत शुभमनच्या चाहत्यांसह समस्त क्रिकेटप्रेमींच्या चर्चेला पूर्णविराम लावला.

मात्र यामुळे काहीवेळ एक वेगळीच चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती. त्याच्या यंदाच्या आयपीएल कामगिरीचा विचार करता, संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात शुभमन गिलचा मोठा वाटा होता. त्याने यंदाच्या मोसमात एकूण १६ सामन्यात ३४.५० च्या सरासरीने ४८३ धावा केल्या होत्या. शुभमन सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!