Skip to content

दाक्षिणात्य अभिनेताच्या ह्या चित्रपटाचा टीझर समोर; चित्रपट मराठीसह ७ भाषेत होणार प्रदर्शित


मुंबई – कन्नड चित्रपट अभिनेते उपेंद्रा व किच्चा सुदीप यांचा आगामी ‘कब्जा’ चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठीसह कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम व ओरिया भाषेत प्रदर्शित होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या केजीएफ २ नंतर हा कन्नड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ज्यात वरील दोघांसह अभिनेत्री श्रिया सरण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा ही १९४२ ची असून ह्यात एका गँगस्टरची कथा मांडण्यात आली आहे. ह्याचे दिग्दर्शन आर. चंद्रु यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर समोर येताच सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.

ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र असे सांगण्यात येते की, येत्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ह्यात विशेष असे की, हा चित्रपट मूळ कन्नड भाषेसोबत मराठी व अन्य भाषेतही प्रदर्शित होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!