Shrikant Shinde | आज कार्यकर्ता मेळाव्यासाठी कल्याणचे खासदार आणि युवसेनाप्रमख डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित आहेत. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित करत असताना त्यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदार संघावर भाजपकडून दावा केला जात होता. मात्र, हेमंत गोडसे यांचा विश्वास होता की, यावेळीही महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. नाशिकमध्ये भाजप आणि मित्रपक्षांकडून अनेक उमेदवार तिकीटासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यातील हा वाद अनेकवेळा दिसून आला होता. मात्र, आता हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर स्वतः श्रीकांत शिंदेंनी शिक्कामोर्तब केली असून, आपल्याला पुन्हा एकदा नाशिकचे खासदार म्हणून हेमंत आप्पांनाच दिल्लीत पाठवायचे असून, यासाठी आपण सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. Shrikant Shinde
Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण तापले
मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आप्पांना दिल्लीत पाठवायचेय
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर कौतुक सुमनांची उधळण केली असून, गेल्या 10 वर्षांत त्यांनी केलेली कामे अधोरेखित केली. त्यांनी नाशिकमध्ये अनेक उद्योगधंदे आणले. त्यांच्या कामाची धडाडी ही कौतुकास्पद असून, आपण अनेक लोकांना त्यांच्या कार्यशैलीचे उदाहरण देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की,”केंद्रात मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला तिसऱ्यांदा हेमंत आप्पांना दिल्लीत नाशिकचे प्रतिनिधीत्व करायला पाठवायचे असून, आता यासाठी तयारिला लागण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. Shrikant Shinde
Shrikant Shinde | हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा निवडून आणायचे आहे.
तसेच फक्त हेमंत गोडसे यांनाच नाहीतर आपल्याला महायुतीचे सर्वच उमेदवारांना निवडून आणायचे आहे. तर, पुनः तिसऱ्यांदा हेमंत आप्पांना दिल्लीत आशिकचे खासदार म्हणून पाठवायचे आहे आणि यासाठी केवळ त्यांनीच नाहीतर आपण सर्वांनी दिवसरात्र काम करायचे असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आज नाशिकमध्ये युवासेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, ज्योती वाघमारे हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. Shrikant Shinde
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे हेदेखील उपस्थित होते. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश देखील करण्यात आला. दरम्यान, आता हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीच्या दाव्यांना स्वतः श्रीकांत शिंदेंनीच दुजोरा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Shrikant Shinde
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम