Shivsena UBT MNS Clash | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असून, राज्यात आता राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्तेही महायुतीचा प्रचार करत अहते. दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी होणार असून, यात छत्रपती संभाजीनगरसह दहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यामुळे येथे मनसे-ठाकरे गटाचा राडा बघायला मिळाला. (Shivsena UBT MNS Clash)
“मनसे आणि दोनशे, उठ दुपारी घे सुपारी” अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली. क्रांती चौकात या दोन्ही सेना समोरासमोर आल्या आणि शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. तर, दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला २० रुपये देऊ केले. हा सर्व राडा भर दुपारी संभाजीनगरच्या क्रांती चौकात बघायला मिळाला. (Shivsena UBT MNS Clash)
MNS Vardhapan Din | नाशकात ‘राज गर्जना’; मला माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवायची
Shivsena UBT MNS Clash | नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना तर, शिंदे गटाने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, संभाजीनगरचे मतदान हे चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणार आहे. मनसे आता महायुतीसोबत असून, मनसेचे कार्यकर्तेही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात या दोन्ही उमेदवारांचे समर्थक समोरासमोर आले आणि घोषणाबाजीसह येथे ठाकरे स्टाइल राडा बघायला मिळाला. (Shivsena UBT MNS Clash)
MNS Vardhapan Din | राज ठाकरेंचे शिलेदार नाशिकमध्ये कडाडले
मनसे लोकसभा निवडणुकीत नसून, ते महायुतीचा प्रचार करत असल्याने महाविकास आघाडीकडून राज ठाकरे आणि मनसैनिक हे पैसे घेऊन प्रचार करत असल्याचे आरोप केले जात आहे. त्यामुळे आज संभाजीनगर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘मनसे आणि दोनशे’, उठ दुपारी आणि घे सुपारी” अशी जोरदार घोषणाबाजी केली. तर, ठाकरे गटाच्या या घोषणाबाजीला उत्तर म्हणून मनसेकडून २० रुपये वाटण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हा फिल्मी स्टाइल राडा पाहायला मिळाला. (Shivsena UBT MNS Clash)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम