Shivsena | शिंदेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर;…पण प्रमुख नेत्याचे नावच नाही

0
17
Shiv Sena Candidate
Shiv Sena Candidate

Shivsena |  राज्यभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असुन, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपने देशातील आणि राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर असून, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावांचा समावेश होता. यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही आपला स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र, यातून एका बड्या नेत्याचे नाव वगळण्यात आले आहे.

शिवसेना शिंदे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या ४० स्टार प्रकारकांची यादी जाहीर केली आहे. तर, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिपाईचे नेते रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तब्बल ४० नेत्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.(Shivsena)

Star Campaigners | महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मात्र, इतर मित्रपक्षांच्या नेत्यांची नावे घेतली असली तरी या यादीत शिवसेनेने लोकसभेतील प्रमुख नेत्याचं नाव वगळलं आयहे. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांच्याच नावाचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता यामागे काय दडलंय. हे पहावे लागणार आहे. तर विशेष म्हणजे जसं भाजपने आपल्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही नावं घेतली होती. तसंच शिवसेनेच्या या यादीतदेखील इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीही नावं आहेत. मात्र, आपल्याच पक्षाच्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचं नाव नसल्यामुळे हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.  (Shivsena)

Shivsena | ‘हे’ आहे शिंदे गटाचे स्टार प्रचारक 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  4. भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा
  5. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  6. रिपाईचे नेते रामदास आठवले
  7. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  8. उपमुख्यमंत्री अजित पवार (Shivsena)
  9. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष – महादेव जानकर
  10. पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष – जोगेंद्र कवाडे
  11. शिवसेना नेते – रामदास कदम
  12. शिवसेना नेते – गजानन किर्तीकर
  13. शिवसेना नेते – आनंदराव अडसूळ

Shivsena Candidate | नाशिकमध्ये ठाकरेंनी पत्ता बदलला; वाजेंना लोकसभेची संधी

  1. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष – चंद्रशेखर बावनकुळे
  2. राष्ट्रवादीचे खासदार – प्रफुल्ल पटेल
  3. खासदार मिलिंद देवरा
  4. मंत्री गुलाबराव पाटील
  5. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे
  6. शिवसेना नेत्या मीना कांबळी
  7. खासदार श्रीकांत शिंदे
  8. मंत्री उदय सामंत
  9. मंत्री शंभुराज देसाई
  10. मंत्री दिपक केसरकर
  11. मंत्री अब्दुल सत्तार
  12. मंत्री तानाजी सावंत
  13. मंत्री संदीपान भुमरे
  14. मंत्री दादाजी भुसे
  15. मंत्री संजय राठोड(Shivsena)
  16. आमदार भारत गोगावले
  17. माजी मंत्री दिपक सावंत
  18. आमदार संजय गायकवाड
  19. आमदार संजय शिरसाट
  20. आमदार शहाजीबापू पाटील
  21. आमदार मनिषा कायंदे
  22. मुख्य समन्वयक नरेश म्हस्के
  23. प्रवक्त्या ज्योती वाघमारे
  24. प्रवक्ते राहुल लोंढे
  25. उपनेते कृपाल तुमाने
  26. आमदार आशिष जैयस्वाल
  27. पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक – किरण पांडव  (Shivsena)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here