Shivsena Candidate | नाशिकमध्ये ठाकरेंनी पत्ता बदलला; वाजेंना लोकसभेची संधी

0
35
Shivsena Candidate
Shivsena Candidate

Shivsena Candidate |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, याआधी भाजपने त्यांच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, यातच आता शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात १६ जागांवरील उमेदवार जाहीर केले असून, नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांना  उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. महाविकास आघडीत अजूनही जगावाटपाचा तिढा कायम आहे. काही जागांवरुन तिन्ही पक्षांत बिनसले असतानाच इकडे ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Shivsena Candidate)

तर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील १६ उमेदवारांची पहिली यादी ही शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे. (Shivsena Candidate)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

Shivsena Candidate | असे आहेत ठाकरे गटाचे उमेदवार 

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  • सांगली -चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर(Shivsena Candidate)
  • शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  • नाशिक – राजाभाऊ वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (Shivsena Candidate)

BJP Lok Sabha | भाजपची रणनीती ठरली; कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?

कोण आहेत राजाभाऊ वाजे..?

राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. ते एका राजकीय घराण्यातील असून त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तर त्यांची आजी रुक्मिणीबाई वाजे सन 1967 मध्ये सिन्नर (विधानसभा मतदारसंघ) च्या पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांचे वडील प्रकाश वाजे हे 2009 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत सिन्नर (विधानसभा मतदारसंघ) येथून निवडून आले होते.

वाजे यांची राजकीय कारकीर्द 

  • 2014: महाराष्ट्र विधानसभेवर निवड
  • 2014: पंचायत राज समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड
  • 2014: ग्रहक संरक्षक परिषद, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
  • 2017: अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
  • 2017: अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here