शिवसेनेतील बंडखोर आमदारांमध्ये जळगावच्या दोन आमदारांचा समावेश

0
3

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली असून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ३० ते ३५ आमदार बंडखोरी केली असून यात जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातील सद्याच्या राजकीय भूकंपावर दिल्ली येथे भाजपचे नेत्या मध्ये खलबते सुरू झाले आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले असून गृह मंत्री अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेकडून नाराज एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न सुरू असून सुरत येथे शिवसेनेचेे निकटवर्तीय दुत पाठवण्यात आले आहे.

 

वर्षा निवास्थानी बैठक सुरू

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकीय निवास्थानी शिवसेना आमदार, मंत्री यांची बैठक सुरू झाली असून यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड देखील पोहचले आहे.

जळगावचे दोन आमदार 

नाराज शिवसेनेचे आमदारामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील किशोर पाटील व पारोळ्याचे चिमणराव पाटील हे देखील असल्याचे विश्वसनीय माहिती समोर आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here