Skip to content

एकनाथ शिंदेंना मनवायला शिवसेना नेते सुरतला रवाना


द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेचे नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतला एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर, शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आता या आपल्या नाराज मंत्र्याला मनवण्यासाठी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटवर्तीय नेत्यांना सुरतला पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

काल सायंकाळी निकाल लागल्यापासून नॉट रीचेबल असलेले एकनाथ शिंदे हे 25 हुन अधिक आमदारांसह सुरत मध्ये एका हॉटेल मध्ये असल्याच्या बातम्या एकामागे एक धडकल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत वेगवेगळे भाकीत वर्तवले जाऊ लागले आहेत. यामुळे आता आपल्या नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांना मनवण्यासाठी शिवसेनेचे मोठे नेते सुरतला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांचे अखेरचे ट्विट, नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत वक्तव्य अशा अनेक कारणांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र आता शिवसेना नेते एकनाथ शिंदेंना भेटल्यावर काय होते? काय चर्चा होते? काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनक म्हणून ओळखले जातात. मात्र असे काय झाले की ते नाराज झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता अजून पुढे काय चित्र उभे राहते हे स्पष्ट होईलच.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!