Sharad Pawar | ‘महाराष्ट्राचे लौकिक या राजकर्त्यांनी घालवले’; नाशिकच्या सभेत शरद पवारांचा घणाघात

0
41
#image_title

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले असून एका दिवसात त्यांच्या पाच सभा होणार आहेत. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या प्रचाराकरिता शरद पवारांनी आज सभा घेतली असून यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. “देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राचे लौकिक या राज्यकर्त्यांनी घालवले. त्यासाठी आपण आता काम केले पाहिजे. सत्तेवर आल्यास शेतकरी, आदिवासी, महिला सुरक्षा याकरिता काम करू, त्याकरिता कॉम्रेड गावितांना निवडून द्या.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Sharad Pawar | 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ कारणासाठी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा खुलासा

काय म्हणाले शरद पवार? 

“आजची सभा ऐतिहासिक आहे. लोकसभा निवडणूकीत तुम्ही महाविकास आघाडीला निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 400 जागा निवडून द्या. अशी मागणी करत होते. 50% पेक्षा कमी खासदार असताना देखील काही सरकार टिकले. पण यांना 400 जागा कशासाठी हव्या होत्या? चौकशी केल्यावर कळले की यांचा वेगळा डाव होता. यांना बाबासाहेबांच्या संविधानात बदल करायचा होता. त्यासाठी त्यांना 400 खासदार हवे होते. आम्हाला शंका आली म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. देशातील लोकांना 400 जागा दिल्या तर संविधान धोक्यात येईल या बाबत सांगितले. मला आनंद आहे सगळ्यांनी धोका जाणला व आकडा ओलांडू दिला नाही. ते सांगतायत आम्हाला संविधान बदलायचे नव्हते. पण त्यांचे खासदार, नेते सांगत होते की मोदींना घटना बदलायची होती. पण बाबासाहेबांची घटना वाचवण्याचे काम तुम्ही केले.” असं म्हणत युतीवर तोफ डागली.

लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही केले भाष्य

त्याचबरोबर, लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी शिंदे सरकारवर निशाणासाधत, “लाडकी बहीण योजना आणली. बहिणींना मदत करा पण तिच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या. शाळेत लहान मुलीवर अत्याचार केले गेले. 680 मुली वीस वर्षांपासून बेपत्ता आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना बहीणींचे संरक्षण करता येत नाही. त्यामुळे बहीणींच्या संरक्षणासाठी आम्ही काम करू.” असे म्हणत आश्वासित केले.

Sharad Pawar | ‘मविआ’च्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी केली भुमिका स्पष्ट

पुढे बोलत, “शेतकऱ्यांचे ही प्रश्न गंभीर होत आहेत. या राज्यात देशाचे जंगल वाचले ते केवळ आदिवासींमुळे. जंगल राखण्याचे काम करणारा आदिवासी कष्टकरी आहे. शेती करणारा आहे. मग हा वनवासी शब्द आला कुठून? जे. पी. गावित यांनी कधी व्यक्तिगत कामे मांडली नाहीत. आदिवासी शेतकऱ्यांचे काम सांगितली आहेत. लाल झेंडा घेऊन मोर्चा काढला त्या मोर्चाची दखल देशाने घेतली होती. त्याचे जे. पी. गावितांनी नेतृत्व केले होते.” असं म्हणत गावितांच्या कामाचे कौतुक केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here