नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक शामकुमार साबळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
राज्यात जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात मोठा बंड पुकारला होता. तेव्हा ठाण्यासह अनेक जिल्ह्यात मोठी फुट झाली होती. मात्र, याचे पडसाद नाशिकमध्ये सुरुवातीला पाहण्यास नाही आले. नंतर, योगेश म्हस्के, प्रवीण तिदमे यांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला, पण अद्यापही मोठा फुट शिंदे गटाल जिल्ह्यात करता आली नाही. तर दुसरीकडे मोठ्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे गटाकडे जाणाऱ्यांवर तेव्हापासून करडी नजर ठेवून आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसोबत नाराज असलेले व जे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत, अश्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्याचा पवित्रा घेतला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून, बुधवारी (दि.१९) ठाकरे गटाकडून नाशिकमधील माजी नगरसेवक शामकुमार साबळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये घोषणा करण्यात आली आहे. मात्र, साबळे यांनी आपण आधीपासूनच शिवसेनेतून बाहेर पडलो असल्याचे सांगत टाकरे गटाला आताशी जाग आल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच या हकालपट्टीला काही अर्थच नसल्याचेही साबळे यांनी यावेळी सांगितले.
शामकुमार साबळे हे नाशिक मनपातील सिडको प्रभाग २५ ड मधून ते २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. शिवाय ते पालकमंत्री दादा भुसे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. दादा भुसे यांनीच त्यांना तिकीट मिळवून दिल्याचे तेव्हा सांगितले जात होते. दरम्यान, राज्यातील सत्तांतरापूर्वी सुरुवातीला ४० आमदार फुटले, त्यात दादा भुसे यांचा समावेश होता. त्यावेळी साबळे यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर त्यांच्यासोबतचा फोटो होता.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेतील अनेक जण शिंदे गटात जाण्यास प्रारंभ झाला त्यावेळी साबळे हे पक्षाच्या बैठकांना व आंदोलनांना अनुपस्थित राहायचे. त्यामुळे साबळे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरु होती. पण त्याअगोदरच ठाकरे गटाने साबळे यांची हकालपट्टी केली आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, की साबळे यांनी आपण उद्धव ठाकरे व शिवसेनेशी निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. तसेच ते कोणत्याही बैठकीस येत नव्हते. त्यामुळे वरिष्ठ पातळीच्या आदेशानुसार त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम