Skip to content

आउटसोर्सिंगच्या आणखी १७५ कर्मचाऱ्यांना सेवेतून केले कमी


द पॉईंट नाऊ: नवनिर्माण कामगार सेनेच्या आऊटसोर्सिंगच्या ठेकेदाराने कामावर न राहणे आणि युनियन बाजी केल्याच्या आरोपावरून कमी केलेल्या साडेचारशे कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी या कामगारांनी महाराष्ट्र माध्यमातून महापालिकेच्या मुख्यालयावर बुधवारी (दि.१९) धडक दिली व कामावर घेण्याची मागणी केली, मात्र ही मागणी दूरच उलट वॉटरग्रेसने आणखी १७५ कामगारांना बुधवारी कामावरून कमी केले.

वॉटरग्रेसने यापूर्वी ४५० कामगारांना कमी केले होते. आता आणखी १७५ कामगारांना काढून नवीन कर्मचारी भरती केली आहे. त्यामुळे ७०० पैकी ६२५ कामगारांना नारळ देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर काढण्यात आल्याने त्यांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश द्यावेत अन्यथा गुरुवारी (दि.२०) सहकुटुंब हे कामगार मोर्चा काढतील असा इशारा मनसेने दिला आहे.

■ नाशिक पश्चिम आणि पूर्व विभागात सुमारे सातशे कामगार आऊटसोर्सिंगने नेमले असून त्याचा ठेका वॉटर ग्रेस कंपनीकडे आहे. काही कामगारांनी मनसे प्रणित कामगार संघटना काढल्याच्या रागातून त्यांना ठेकेदार आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार असून यासंदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र यानिमित्ताने कामबंद करणाऱ्या आणि अगोदरच्या ७५ अशा साडेतीनशे कामगारांना वॉटरग्रेसने कमी केले आहे.

■ मनसेचे नेतृत्व स्वीकारत शहराध्यक्ष दिलीप दातीर, सलीम शेख, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष परशुराम साळवे आणि पृथ्वीराज येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक देऊन धरणे आंदोलन केले. या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्याशी चर्चा केली आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

■ ऐन दिवाळीत कामावरून काढणे हे चुकीचे असून या कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी केली. त्यानुसार अशोक अत्राम यांनी वॉटरग्रेसच्या संचालकांना दूरध्वनी करून या कामगारांना तातडीने कामावर घेण्याची सूचना केली. त्यावर दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. यावेळी संदीप भवर, तुषार जगताप, संतोष कोरडे, विजय आहिरे, मनविसे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, प्रफुल बनभेरू आदी उपस्थित होते.

कामावर नसल्याने केले कमी

■ ऐन दिवाळीच्या कालावधीत वॉटरग्रेस मधील कामगारांचा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर नसल्याने यापूर्वी कंपनीने ४५० कामगार कर्मी केले होते. बुधवारी १९ आणखी १७५ कामगार कमी केले.

■ शहरातील स्वच्छतेचे कामकाज थांबवून आंदोलने करण्यात येत असल्याने ही कार्यवाही करून नवीन कामगार नियुक्त करण्यात आल्याचे वॉटरग्रेसचे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!