Satej Patil | ‘राज्याचं गृहमंत्रालय फेल’; सतेज पाटील फडणवीसांवर कडाडले

0
60
#image_title

Satej Patil : सध्या राज्यामध्ये घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करत सतेज पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जे काही चालले आहे त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत राज्याचं गृहमंत्रालय कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये असफल ठरल्याचे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले आहे.

“बदलापूर आणि मालवण येथील घटनेचे आरोपी अद्यापही सापडले नाहीत पुण्यात राजरोसपणे खून होत आहेत. पुण्यामध्ये काल कोणता करणे पोलिसांवर हल्ला केला आहे. या सगळ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत राज्यात पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गृहमंत्रालय सफशेल फेल गेले” असल्याची टीका पाटलांनी केली आहे.

Mahayuti Sarkar | शिंदेंच्या नेत्यांमुळे युतीत वादाची ठिणगी; शिंदे करणार आज नेत्यांची कानउघडणी..?

Satej Patil | छत्रपतींचा इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटी वरून बोलत “शिवरायांचा इतिहास बदलण्याचे काम सुरू” असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. “त्यांचा इतिहास कच्चा असल्याचे सर्व इतिहासकाराने सांगितले आहे. इतिहासाचे अनेक दाखले पाहिल्यानंतर खरा इतिहास आता लोकांच्या समोर येऊ लागलाय त्यांना राज्याबद्दल इतकं प्रेम आहे की चक्क उद्योग घेऊन जात आहेत आणि हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत आहे.” असे म्हणत सतीश पाटलांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ” मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणात फक्त माफी मागून भागायचे नाही या चुकीमुळे संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे तेव्हा शिक्षा झालीच पाहिजे.” अशी मागणी पाटलांनी केली.

Maharashtra Politics | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार..?; बघा नेमकं प्रकरण काय?

महायुती निवडणुका पुढे ढकलणार नाही

तर आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य करत “महायुती निवडणूक पुढे ढकलेल असे वाटत नाही. निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल. महायुतीत जागा वाटपाबाबत भांडण असल्याचे समोर येत आहे. तसेच घटने विरुद्ध सरकार हे जनतेला पटलेले नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना फोडण्याचे पाप यांनी केला आहे. लोकांच्या मनात काय आहे हे या निवडणुकीतून दिसेलच असं म्हणत सरकार वरती टीका केली

तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये अजूनही कसली चर्चा झाली नसल्याचे सतीश पाटील यांनी यावेळी सांगितले. सेना-राष्ट्रवादीच्या चर्चेनुसार कागलची जागा राष्ट्रवादीला सुटली असेल, असेही त्यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here