Taked | टाकेद येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
28
Taked
Taked

राम शिंदे – प्रतिनिधी : टाकेद |  इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद येथे ‘७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महर्षी वाल्मिकी आश्रम शाळा या सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.(Taked)

यावेळी सरपंच ताराबाई रतन बांबळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत टाकेद येथील कार्यालयाचा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रध्वज फडकवला. याप्रसंगी सरपंच सौ. ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, प्राचार्य तुकाराम साबळे, ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे, लता लहामटे, भामाबाई धादवड, रतन बांबळे, आबाजी बारे, नंदू जाधव, व गावातील सर्व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.

Sarvtirth taked : म्हैसवळण घाट रस्त्यासंदर्भात मनसेचे इगतपुरी तहसीलला निवेदन

त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सरस्वतीपूजन करून मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला देशभक्तीपर गीते, प्रभू श्रीराम यांच्यावर आधारित सुप्रसिद्ध गीते यांसह आदिवासी गीतांवरती अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करत उपस्थित ग्रामस्थ प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. याप्रसंगी टाकेद आणि परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद वर्ग उपस्थित होते.(Taked)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here