सर्वतीर्थ टाकेद | शालेय पोषण आहारात सडलेले टोमॅटो; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

0
30
सर्वतीर्थ टाकेद
सर्वतीर्थ टाकेद

राम शिंदे – प्रतनिधी : सर्वतीर्थ टाकेद |   गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची शाळा शिक्षणाची ‘ज्ञानगंगा’ ठरते. पण याच शाळांमध्ये सरकारमार्फत विद्यार्थ्यांना दिला जाणारा दैनंदिन पोषण आहार दैनंदिन शिक्षण विविधांगी उपक्रम याचीही कुणीतरी नक्कीच पाहणी करायला हवी. म्हणजे त्या शाळेची गुणवत्ता व पारदर्शकता दिसून येईल. एकीकडे सरकार विद्यार्थ्यांचे दैनंदिन वजनदार दप्तर कमी करते आहे. स्कुल बॅग मधील वजनदार टिफिन पासून ते पाठ्यपुस्तकापर्यंत सर्वच गोष्टी शाळेमध्येच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. (सर्वतीर्थ टाकेद)

विद्यार्थ्यांना वेगवेगळा ‘पोषक आणि ऊर्जा देणारा पोषण आहार’ अशी जाहिरात बाजी देखील व्यवस्थित करत आहे. परंतु, याच विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार नक्की योग्य दर्जाचा दिला जातो का ?. शिजवलेल्या पोषण आहारात व्यवस्थित कडधान्यासह मसाला भाजीपाला वापरला जातो काय?. याची स्वतःहून पालकवर्गाने कधी पाहणी केली का?. दरम्यान, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत अधरवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप महाले यांनी शाळेत पोषण आहार कसा शिजवला जातो. याची प्रत्यक्षात पाहणी केली असून, यावेळी त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष उघडकीस आणले आहे.

Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र

सर्वतीर्थ टाकेद | नेमकं प्रकरण काय..?

बुधवार (दि २७) रोजी संदीप महाले यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन तेथील पोषण आहारात काय काय वापरले जाते. याची पाहणी केली असता, त्यांना तिथे पोषण आहारात चक्क सडलेले टोमॅटो वापरले जात असल्याचे आढळून आले. महाले यांनी या सडलेल्या टोमॅटोचे व्हिडीओ काढत शाळेतील मुख्याध्यापकांना दाखवत त्याचा जाब विचारला असता, शाळेकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर महाले यांनी गट शिक्षणाधिकारी पाटील यांना संपर्क साधत सदर बाब कळवली. (सर्वतीर्थ टाकेद)

एकीकडे सरकार शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी विविधांगी योजना राबवत आहे. तर दुसरीकडे त्याच शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणणारे पोषण आहार दिले जात असतील. तर ही विद्यार्थी पालकवर्गासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे. याची संबंधित शालेय शिक्षण विभागाणे वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. तरी अधरवड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा अयोग्य दर्जाचा पोषण आहार व पोषण आहारात वापरले जाणारे कडधान्य सडलेले टोमॅटो भाजीपाला याची प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी व शाळेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप महाले यांनी केली आहे.(सर्वतीर्थ टाकेद)

Taked | न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

“गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या शिक्षणासाठी एकमेव मुख्य आधार आहेत. परंतु याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असेल व पोषण आहारात चक्क सडलेले टोमॅटो आणि भाजीपाला वापरला जात असेल. तर हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात आहे. उघडकीस झालेल्या प्रकारावर संबंधित प्रशासनाने शालेय शिक्षण व्यवस्थापन कमिटीने वेळीच हा गैरप्रकार थांबवावा व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.”
– संदीप महाले, (सामाजिक कार्यकर्ते) अधरवड


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here