Sanjay Raut | बदलापूर येथील शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांकडून स्वसंरक्षणात एन्काऊंटर करण्यात आला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस व्हॅन मध्येच हा गोळीबाराचा प्रकार घडला. ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. राजकीय वर्तुळातूनही आता विविध प्रतिक्रिया उलटायला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांचा सत्र सुरू झाला आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या एन्काऊंटर प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Badalapur Case | बदलापूर लैगिंक आत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; नेमक काय घडलं…?
काय म्हणाले संजय राऊत?
टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना संजय राऊत यांनी या एन्काऊंटर प्रकरणी प्रश्न उपस्थित केले असून “हा प्रकार संशयास्पद आहे. एखाद्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर होणे यामध्ये हळहळ व्यक्त करण्यासारखे काही नाही. परंतु हा इन्काऊंटर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झाला आहे. ज्या संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले त्या शाळेत तो शौचालय साफ करत होता. सफाई काम करणारा मुलगा पोलिसांच्या कमरेवरील बंदूक हिसकावणार? ती बंदूक बंद असते. तिला लॉक असते. हे कोणाला पटेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच “शिंदे-फडणवीस सरकारला आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचे आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावाच नष्ट केला. जेव्हा बदलापूरच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला आमच्या ताब्यात द्या. फाशी द्या. अशी मागणी केली, तेव्हा फडणवीसांनी सांगितले होते की ‘कायदा हातात घेऊ देणार नाही’ आणि दुसऱ्याच दिवशी त्या सर्व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक का केली? ज्यांच्यावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यांना अजून अटक का केली नाही? असा सवाल त्यांनी विचारला.
राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप
“शाळेचे संस्थाचालक हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज का काढून टाकले? नेमके त्या काळातील का काढले? हे संस्थाचालकांचे काम आहे. एकनाथ शिंदे देखील त्याच्याशी संबंधित असून त्यांना वाचवण्यासाठी कालचे कथानक रचले होते. असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला.
शिंदे-फडणवीस आरोपींना वाचवतायत
“बलात्काऱ्यांना अशा प्रकारच्या शिक्षा व्हायला पाहिजे याविषयी आमचे दुमत नाही. परंतु कोणालातरी वाचवण्यासाठी हा बनाव रचला असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी हे अन्य आरोपींना वाचवण्यासाठी रचलेले कथानक आहे. सध्या राज्यामध्ये मनोज जरांगे यांचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी गंभीर आरोप यावेळी राज्य सरकारवर केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम