Sanjay Raut | वायफळ बडबड करण्यापेक्षा..; मालेगाव कोर्टाने राऊतांना झापले

0
23
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut | राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणी मालेगाव न्यायालयात सुनावणी सुरू होती. २ डिसेंबर रोजी संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान, आज ३ फेब्रुवारी रोजी संजय राऊत हे कोर्टात नियमित सुनावणीसाठी हजर नसल्याने आज मालेगाव न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले आहे. वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या, या शब्दांत कोर्टाने संजय राऊत यांना पुरावे सादर करण्यासाठी बजावले आहे.

न्यायालयाने राऊतांना फटकारले 

आज मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर सुनावणी पार पडली. मात्र, या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत हे गैरहजर होते. याउलट पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली आहे. दरम्यान, संजय राऊत हे गैरहजर असल्याने न्यायालयाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा काही पुरावे सादर करावे, या शब्दांत न्यायालयाने वकिलांमार्फत त्यांना सुनावले आहे.(Sanjay Raut)

Arvind Kejriwal | अन् भाजपने ‘आप’च्या अडचणी वाढवल्या..?

Sanjay Raut | नेमकं प्रकरण काय..?

गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार तथा दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी एक वृत्त प्रसिद्ध केले होते. ज्यात त्यांनी दादा भुसे यांनी १७८ कोटींच्या शेअर्सचा घोटाळा केला असल्याचे आरोप केला होता. या प्रकरणी संजय राऊत यांनी माफी मागावी नाहीतर, त्यांच्यावर मानहाणीचा खटला दाखल करण्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला होता. यावर खासदार संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला असून, यानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.(Sanjay Raut)

Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

दरम्यान, आज संजय राऊत हे सुनावणीसाठी न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले आहे. दादा भुसेंच्या वतीने ॲड.सुधीर अक्कर यांनी तर खासदार संजय राऊत यांच्या वतीने ॲड. मधुकर काळे हे बाजू मांडत आहे. २३ ऑक्टोबर रोजी खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश केले होते. मात्र, ये यावेळीही गैरहजर राहिले आणि त्यावेळी त्यांनी ‘शिवसेना दसरा मेळाव्या’चे कारण दिले. त्यानंतर ४ नोव्हेंबरला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यावेळीही ते गैरहजर होते.(Sanjay Raut)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here