सॅमसंगने गुपचूपमध्ये आणला हा स्मार्टफोन; रॅम ४ जीबीची पण फीचर्स आहे एक नंबर !

0
2

द पाॅईंट नाऊ 

स्मार्टफोन बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने आपल्या Galaxy सिरीजअंतर्गत एका स्मार्टफोनचे गुपचूपपणे लाँच केले आहे. Samsung Galaxy A04e असे या स्मार्टफोनचे नाव असून या सिरीजमधील नुकतेच लाँच करण्यात आलेल्या Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04s नंतरच हा तिसरा स्मार्टफोन आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला असून ह्यात एकशेएक फीचर्स कंपनीने दिले आहे. पाहूयात याचे फीचर्स…

बॅटरी व स्टोरेज

या स्मार्टफोनला 4 जीबीची रॅम व 128 जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. पण Samsung Galaxy A04e स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून जो OneUI Core 4.1 सह एकत्र काम करतो. हा स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4G LTE वर काम करतो.

डिस्प्ले

हा स्मार्टफोनला 6.5 इंचाच्या HD डिस्प्लेवर देण्यात आला आहे, जो पॅनेलवर बनवला आहे. सॅमसंगने या फोनच्या स्क्रीनला इन्फिनिटी ‘V’ असे नाव दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला MediaTek Helio G35 चिपसेट आहे. त्याच वेळी, हा मोबाईल फोन ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU लाही सपोर्ट करेल.

कॅमेरा

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जो फोनच्या मागील पॅनलवर, एलईडी फ्लॅशसह फोटोग्राफीसाठी सुसज्ज आहे. 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, जो F/ 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरच्या संयोजनात कार्य करतो. त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी F/2.2 अपर्चरसह 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाइट ब्लू कलरमध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत येत्या काही दिवसांत आपल्यासमोर येईल. पण असे सांगण्यात येते की, या फोनची किंमत जवळपास 12 हजाराच्या आसपास असू शकते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here