Skip to content

आयसीसी टी20 वर्ल्डकप : भारतचं पारडं जड, पण काही सांगता येत नाही सामन्याचं


क्षितीज लोखंडे, द पॉईंट नाऊ

आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आमनेसामने भिडणार आहे. स्पर्धेत परस्परांमध्ये आतापर्यंतचे खेळलेले सामने पाहता भारताचे पारडे जड असले, तरी खेळात काहीही होऊ शकते याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.

आज दुपारी दीड वाजता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना रंगणार असून अनेक चाहते या महामुकाबल्याची आतुरतेने वात पाहत आहेत. केवळ चाहतेच नव्हे, तर दोन्ही संघातील खेळाडूही या महामुकाबाल्यासाठी सज्ज आहेत. जरी स्पर्धेत भारताचे पारडे जड असले, तरी उभय संघांमधील झालेले मागील काही सामने पाहता खेळत काहीही शकते. तसेच असेही सांगण्यात येत आहे, की या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज तेथील हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड व भारतीय संघ कोणते डावपेच आखणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या सामन्यागोदर भारत व पाकिस्तान अवघ्या वर्षभराच्या कालावधीत तीनदा आमनेसामने आला आहे. त्यात भारताला १ व पाकिस्तानला २ विजय मिळवता आला आहे. मागील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानकडून १० विकेट्सने हरला होता. त्यामुळे हे सर्व बघता भारतीय संघासाठी हे आव्हान म्हणावे तितके सोपे नाही. कारण, पाकिस्तानचा घातक गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर परत आल्यानंतर त्याने ज्यापद्धतीने सराव सामन्यात अफगाणिस्तानाच्या फलंदाजांचे वाभाडे काढले होते. ते पाहता पाहता मोहम्मद रिझवानही भारतासाठी मोठा अडथळा ठरू शकतो.

त्यामुळे टीम इंडिया या सर्व परिस्थितीचा खोलवर अभ्यास करून आलाच असेल, याबद्दल काहीच दुमत नाही. कारण भारताकडे अनेक स्टार फलंदाजांचा भरणा आहे. तो सुर्याकुमार, हार्दिक पांड्या, दिनेश कातिक असो, की विराटपासून स्वतः कर्णधार रोहित असो. तसेच जितकी फलंदाजीही खतरनाक आहे, तितकीच गोलंदाजीतही अनुभवींची काही कमी नाही. हा भलेही भरावश्याचा गोलंदाज बुमरह नसला, म्हणून काय झाले. त्याच्या जागेवर आलेला मोहम्मद शमी, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गाजवली होती. सोबत अर्शदीप सिंगसारखा नवखा खेळाडू व आर आश्विन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल हे फिरकीपटू सामन्यात चालले, तर समजा हा सामना भारताच्या नावावर असेल.

तेथील हवामान खात्याने आधी या सामन्याच्या दिवशी मेलबर्नमध्ये खराब हवामानाची शक्यता होती. मात्र, सध्या मेलबर्नमध्ये पाऊस थांबला असून तिकडे जोरदार सूर्यप्रकाश आला आहे. तसेच, या महामुकाबल्याच्या दिवशीही पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता खेळाडू आजच्या सामन्यासाठी सज्ज असून चाहतेही याची आतुरतेने वाट पाहत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!