Samruddhi Mahamarg | समृद्धी मुंबईच्या वेशीपर्यंत; मंत्री भूसेंच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

0
17
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg |  ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोमवार (दि. ४) मार्च रोजी होणार आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, सकाळी ११.०० वाजता इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो., ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग असून, याच्या पहिल्या टप्प्याचे उ‌द्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. यानंतर आता या महामार्गाच्या तिसऱ्या टप्याचे लोकार्पण उद्या होणार आहे. तिसऱ्या टप्यात भरवीर ते इगतपुरी या २५ किमी अंतराचे लोकार्पण होत असून, आतापर्यंत ६२५ किमी. रस्ता पूर्ण झाला आहे. राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, राहणीमान सुधारावे या उद्देशयाने समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे.(Samruddhi Mahamarg)

Dada Bhuse | मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गामुळे राज्याची समृद्धी वाढणार

  • समृद्धी महामार्गाशी ग्रामीण भागाचा कनेक्ट वाढून यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
  • समृद्धी महामार्गामुळे सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय शहर असलेली मुंबई आणि राज्याची उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे.
  •  या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
  •  समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच १३८.४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प देखील उभारण्यात येत आहे.
  • तसेच यामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्हे यामुळे जोडले जात आहेत
  • हा महामार्ग मुंबईशी जोडला जाईल तेव्हा वाहतुकीचा भार हलका होण्यास मदत होईल. (Samruddhi Mahamarg)

Nashik | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा

महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिडी हे १० तासांचे अंतर फक्त पाच तासातच आर करणे शक्य झाले आहे. तसेच यामुळे जलदगती वाहतूक आणि व्यापऱ्यांना त्यांचा माल देशभरात पोहोचवणे शके झाले आहे. समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिल्हयातील भरवीर इंटरचेंज दरम्यानचे 79.177 किमी. लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. .११. १२ आणि १३ थे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यतचे काम पूर्ण झाले आहे.

तर, आता तिसऱ्या टप्प्यात भरवीर इंटरचेंज (कि.मी 600 + 128) ते इगतपुरी गापुरी (कि.मी. 625) पर्यंत काम पूर्ण झालेले असून, उद्या मंत्री दादाजी भुसे हे या कामाचे लोकार्पण करणार आहेत. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करुन ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणा-या भाविकांना कमी वेळात प्रवास शक्य होणार आहे. याशिवाय शिर्डी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तलूयक्यातील शेतकऱ्यांना तांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुंबईला कमी वेळात ये जा करता येणार आहे.(Samruddhi Mahamarg)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here