Road Damage | रस्त्यांची झाली चाळण; सर्वतीर्थ टाकेदचा खोळंबला विकास

0
19
Road Damage

Road Damage | राम शिंदे – सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वत्र जगभरात ओळख असलेल्या प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. सत्तेचा कायापालट झाला, अनेक लोकप्रतिनिधी बदलले तर अनेकांचा कार्यकाळ संपत आला परंतु या प्रेक्षणीय नावाजलेल्या अत्यंत महत्वपूर्ण पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न आजही आहे त्या अवस्थेत पडून आहे.

Ram Mandir | जे भाजपला नाही जमले ते ठाकरेंनी करून दाखवले

सर्वतीर्थ टाकेद म्हंटल की, प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, भक्तराज जटायू पक्षाला मोक्ष देण्यासाठी एक इतिहास कालीन रामायणातील जिवंत आख्यायिका असलेले जगातील सर्व तीर्थांचे पाणी असलेले एकमेवाद्वितीय ठिकाण म्हणजेच सर्वतीर्थ टाकेद. एक आदिवासी भागातील एकमेव मध्यवर्ती महसुली बाजारपेठ, शिक्षणाचे माहेर घर अश्या विविध माध्यमातून प्रसिध्द असलेले आणि अहमदनगर-नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणारे सर्व पंचक्रोशीतील एकमेव मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच सर्वतीर्थ टाकेद होय.

याच पवित्र ठिकाणी जगभरातून सर्वत्र देशभरातून भाविक भक्तगण पर्यटक येत असतात. इतकेच नव्हे तर याच ठिकाणाहून छत्रपती शिवरायांच्या किल्ले विश्रामगड, बितनगड याठिकाणी म्हैसवळण घाट मार्गे रस्ता जातो. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर,किल्ले, अदण, मदन, कुलंग, रंधा फॉल, भंडारदरा धरण, रतनगड, सांधण दरी, हरिश्चंद्र गड अश्या विविध नामांकित पर्यटन स्थळांवर याच सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणाहून रस्ते जातात परंतु आज हेच मध्यवर्ती असलेले सर्वतीर्थ टाकेद हे रस्त्यांच्या गर्तेत अडकलेले आहे.

Road Damage – रस्त्यांच्या समस्येमुळे या तिर्थस्थानी पर्यटकांची संख्या ओसरली

आज या ठिकाणाला जोडणारा टाकेद ते धामणगाव रस्ता मंजूर असून अर्धवट अपूर्ण अवस्थेत आहे. अधरवड ते टाकेद आणि टाकेद ते म्हैसवळण घाट रस्ता आज पूर्णपणे दुरावस्थेत आहे तर टाकेद गाव ते टाकेद तीर्थपर्यंत असलेला अत्यंत महत्त्वाचा रस्ता आज पूर्णपणे खड्ड्यांच्या साम्राज्यात खितपत पडून आहे. याच रस्त्यांच्या समस्येमुळे या प्रेक्षणीय तिर्थस्थानी येणाऱ्या पर्यटकांची संख्या यांसह भाविक भक्तगण व्यवसायिक व्यापारी प्रवासी यांची संख्या आज कमी झाली असल्याने याचा थेट परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. इतकेच नव्हे तर या रस्त्यांमध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा झाली नसल्याने येथिल स्थानिक ग्रामस्थ पूर्णपणे आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

Gold Rate Today | सोन्यात वाढ तर चांदी जैसे थे; असे आहेत सोने-चांदीचे दर

Road Damage | स्ता प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष

एकीकडे या रस्ता प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आहे. आज स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाच याचा जाब विचारण्यात यावा असा सूर स्थानिक ग्रामस्थांकडून केल्या जात आहे. तोंडी आश्वासन नको तर प्रत्यक्षात रस्त्यांमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे आज या मुख्य ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था खूप दयनीय झाली असून याकडे कुणीही लक्ष्य देत नसल्याचे चित्र आजपर्यंत पहावयास मिळत आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे आज समजत नाही तरी हे जीवघेने अपघातप्रवन क्षेत्र बनलेले रस्ते किमान येत्या महाशिवरात्री यात्रेच्या आत तरी सुधारले पाहिजे अशी खंत अपेक्षा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

“सर्वतीर्थ टाकेद तीर्थक्षेत्राला जोडलेल्या सर्वच रस्त्यांची आज अत्यंत दयनीय अवस्था असून येथील अपघाती जीवघेण्या रस्त्यांचा प्रश्न कधी सुटणार आणि कोण सोडविणार हे देवच जाणे”एस एम बी टी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा प्रश्न देखील या रस्त्यांमुळे ऐरणीवर आला आहे. येत्या महाशिवरात्रीच्या आत जर हा रस्ता प्रश्न सुटला नाही तर समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” – संग्राम पाटील ,स्थानिक ग्रामस्थ


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here