Deola | देवळा येथे ‘नमो चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

0
30
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  नाशिकच्या चांदवड – देवळा मतदार संघात ‘नमो चषक’ च्या माध्यमातून भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात युवकांमध्ये चेतना जागृत होणार असल्याने तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन मतदार संघाचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी आज येथे केले.(Deola)

देवळा येथे शनिवार (दि.  १३) रोजी ‘नमो चषक’ अंतर्गत आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट व रनींग स्पर्धेचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक जितेंद्र आहेर, भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल पवार, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष योगेश आहेर, माजी नगरध्यक्ष ज्योत्स्ना आहेर, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, माजी उप नगराध्यक्ष अशोक आहेर, डॉ. रमणलाल सुराणा, सपोनि दीपक पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी कौतिक ठुमसे आदी उपस्थित होते.(Deola)

Deola | व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद पत्रकारांमध्ये – सपोनि दीपक पाटील

दि १३ ते २२ जानेवारी पर्यंत होणाऱ्या या नमो चषकात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याकामी क्रीडा शिक्षक सुनील देवरे यांच्यासह तालूक्यातील माध्यमिक शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. अरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान आहेर यांनी केले. आभार योगेश आहेर यांनी मानले.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here