Republic Day | देशाचा ७५ वा ‘गणतंत्र दिवस’ हा उद्या साजरा होत असून, या आनंदाच्या क्षणी नाशिक जिल्ह्यातील जवळपास २५ अनुकंपा धारक पात्र उमेदवारांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेंच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ५२५ पात्र उमेदवारांना गेल्या वर्षभरात लाभ मिळाला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा लाख नोकर भरतीच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या राज्यातील 75 हजार नोकर भरतीच्या घोषणेनंतर देशभरातील युवकांना सरकारी सेवेत सामावून घेण्यात आले. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ५०० पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली असून, गणतंत्र दिनाच्या निमित्ताने जवळपास २५ पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५२५ लाभयार्थ्याना लाभ देण्यात आला असून, पात्र उमेदवारांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले आहे.(Republic Day)
Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले
“राज्यात नाशिक जिल्ह्याचे काम हे अग्रस्थानी असून यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आपआपसात समन्वय साधत हा प्रलंबित प्रश्न निकाली लावला आहे. यामुळे राज्यात नाशिक जिल्ह्याचे काम पुन्हा प्रकर्षाने समोर आले आहे. या भरतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, लाभयार्थ्यानी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
Republic Day | स्वातंत्र्य सैनिकांचा होणार सन्मान..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा मिळणार असून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.(Republic Day)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम