Ratnagiri Sindhudurg | निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत. मात्र, अजूनही महायुतीत काही जागांचा तिढा हा कायम असून, या जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाही. यात यवतमाळ-वाशिम, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि नाशिकच्या जागेचा तिढा होता. यापैकी सातारा, यवतमाळ-वाशिमचा तिढा सुटला असून, या दोन्ही जागांवर अजित पवार गट आणि शिवसेनेला तडजोड करावी लागली आहे. यानंतर आता आणखी एका जागेवर भाजपसमोर शिंदे गटाला माघार घ्यावी लागली असून, नुकतंच भाजपने आपल्या उमेदवारांची १३ वी यादी जाहीर केली आहे. यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(Ratnagiri Sindhudurg)
या जागेवर उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांचे लोकसभा निवडणूक लढवणीसाठी इच्छुक होते. बंधुप्रेमासाठी उदय सामंत यांनी प्रतिष्ठा पणाला लावत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. मात्र, सामंत बंधूंनी येथे सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाला भाजपसमोर माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघामधुन महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यामुळे आता येथे आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांची लढत रंगणार आहे. (Ratnagiri Sindhudurg)
Nilesh Rane | टिका करणे राणेंना भोवले; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तूफान दगडफेक
Ratnagiri Sindhudurg | नारायण राणेंसाठी अमित शहा मैदानात
नारायण राणे यांनाच उमेदवारी दिली जाईल. हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे आपली उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी सभांचा धडाका लावला होता. तर, उद्या शक्ती प्रदर्शन करत राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एवढंच नाहीतर, नारायण राणेंसाठी स्वतः भाजपचे केंद्रीय नेते मैदानात उतरणार असून, त्यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे.(Ratnagiri Sindhudurg)
Nitesh Rane | बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार – आ. राणे
किरण सामंत हेदेखील कधी ना कधी खासदार होतील
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत सुरू होता. येथे उमेदवारी राणे की सामंतांना..? यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत वाद सुरु होते. मोदी-शाहांनी यंदा नारायण राणे यांना राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले असून, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, “नारायण राणे हे उमेदवार असले तरी, किरण सामंत हे त्यांचं काम करतील” असे मंत्री उदय सामंतांनी सांगितले आहे. तर, “किरण सामंत हेदेखील कधी ना कधी खासदार होतील”, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. (Ratnagiri Sindhudurg)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम