Rape & murder : एका राज्यांत नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, आता अशाच प्रकारे राजस्थान म्हणून आणखीन एक भयानक घटना उघड झाली आहे भिलवाडामध्ये एका १२ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आल्याची अमानुष घटना समोर आली आहे. (Rape & murder)
भिलवाडातील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसिंहपुरा गावाचे आहे. गावात राहणारी १२ वर्ष वयाची एक गरीब घरातील मुलगी शेळ्यांना चारण्यासाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला पण ही मुलगी घरी परत आली नाही, रोज ती वेळेवर येत असे आणि घर कामात पुन्हा मदत करीत असे. मात्र तिला उशीर झाल्याने घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शेतात वीटभट्टीत काहीतरी जळत असलेले (Rape & murder) दिसले.
https://thepointnow.in/raw-agent-sima-haidar/
भट्टीजवळ पाहिले असता कोळशाच्या राखेत मुलीची चांदीची बांगडी आढळली. भट्टीजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडेही सापडले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच हालली, काय करावे त्यांना समजेना, सर्वजण मोठ्या दुःखात बुडाले.(Rape & murder)
भट्टीजवळ बांगडी दिसल्याने संशय
आपली मुलगी कुठेच दिसत नाही परंतु तिची हातातील बांगडी या भट्टीजवळ कशी काय अशी शंका तिच्या कुटुंबीयांना आली, तिची चांदीची बांगडी दिसल्याने त्यांच्या मनात मोठा संशय आला.(Rape & murder)
याबाबत त्यांनी परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला भट्टीत जाळल्याची माहिती मिळाली. परिसरात चौकशी केल्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.(Rape & murder)
ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. संबंधित तपास पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने मुलीचे अवयव व बांगडी जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Rape & murder)
एकीकडे दिल्ली सारख्या मेट्रो सिटीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले जातात दुसरीकडे महिलांना विवस्त्र करून त्यांची दिंड काढली जाते. त्यातच आता अल्पवयीन बारा वर्षे बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिला वीट भट्टीमध्ये जाळलं जातं. या सगळ्या प्रकारांमुळे देशात नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थित होण्याबरोबरच शासन यावर कठोर उपाय योजना करून वाढत्या घटनांचे हे प्रमाण कधी थांबवणार असा संतवाल उपस्थित केला जातो आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम