Skip to content

Raw Agent Sima Haidar : पाकिस्थानहुन आलेली सीमा हैदर होणार रॉ एजंट


Raw Agent Sima Haidar :  ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारतामध्ये दाखल झालेली सीमा हैदर ही आता सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

सीमा हैदर ही पाकिस्तान मधून आल्यामुळे ती गुप्तहेर असल्याचा संशय असल्यानं तिची गेल्या काही दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सचिन सीमा ही जोडी आर्थिक अडचणीत देखील असल्याचा चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यातच आता सीमा हैदरीला चित्रपटांमध्ये काम मिळालं असल्याचं वृत्त “यूपी तक” या वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडिओ मधून समोर आल आहे. (Raw Agent Sima Haidar)

या व्हिडिओ सोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम सीमा हैदरला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी तिच्या घरी गेली होती. यावेळी चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सिमा हैदर ची ऑडिशन घेऊन तिला चित्रपटात काम देण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान मध्ये असलेल्या उदयपूर मधील शिंपी कन्हैयालाल साहूच्या हत्येवर आधारित टेलर मर्डर स्टोरी हा चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटांमध्ये सीमा हैदरला महत्त्वाची भूमिका देण्यात आली असल्याच्या चर्चा आहेत.(Raw Agent Sima Haidar)

https://thepointnow.in/shirdi-sex-racket/

काही दिवसांपूर्वी जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊस तर्फे अमित जानी यांनी सीमा आणि सचिन यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. मुंबई चित्रपट प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. हे प्रोडक्शन हाऊस उदयपूर मधील शिंपीच्या हत्येवर आधारित चित्रपट बनवत असल्याने त्यांनी सीमा हैदर हिला या चित्रपटात रॉ एजंट ची भूमिका देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.(Raw Agent Sima Haidar)

दरम्यान सीमा हैदर ही पबजी गेमच्या माध्यमातून भारतामध्ये दाखल झाली असल्याने ती गुप्तहेर असल्याचा संशय एटीएसला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिची एटीएस कडून कसून चौकशी केली जात होती. यातच सीमा हैदर आणि चित्रपटाची टीम एटीएस च्या अहवालाची वाट बघत असून या अहवालानंतर सीमा या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार असल्याचे देखील सांगण्यात आल आहे.(Raw Agent Sima Haidar)

दरम्यान सीमा हैदर हिला भेटायला गेले असता चित्रपट निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदर हिने हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल तिचं भगवी शाल देऊन स्वागतही केलं आहे. तसेच यावेळी सीमा हैदरने त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत भारतीय संस्कृती जपल्याचे देखील सांगण्यात येत आहे.(Raw Agent Sima Haidar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!