Ram Mandir | मुख्यमंत्र्यांचे राज्यातील मंदिरांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0
20
Ram Mandir
Ram Mandir

Ram Mandir |  अयोध्येत २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या राम लल्लांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा आणि राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देशभरातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, यानुसार आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये आता स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

गेल्या १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी ‘राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या’ उद्घाटनाप्रसंगी युवांना संबोधित करताना मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.(Ram Mandir)

Ram Mandir | जे भाजपला नाही जमले ते ठाकरेंनी करून दाखवले

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिंदे यांनी रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी याबाबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मंदिरे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील जिल्हा दंडाधिकार्‍यांनी सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून त्यांना ‘विद्युत दिव्यांनी’ सजवावे. तसेच हे बदल आठवडाभरात दिसायला हवे, असे निर्देश केले आहेत.(Ram Mandir)

मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेने मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी नियमित अंतराने एका विशेष योजनेद्वारे निधीचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे. तसेच या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी राज्य महसूल विभागाला दिले.(Ram Mandir)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, २१.८ किमी लांबीच्या ‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक’चे उद्घाटन करण्यापूर्वी नाशिक येथील काळाराम मंदिरात स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर, नाशिकच्या तपोवन मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीच्या अभिषेकपूर्वी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचेही आवाहन केले होते. दारमीन, मोदींच्या या आवाहनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये स्वच्छतेबाबत मोहीम राबवून लोकांना जागरूक केले आहे.(Ram Mandir)

Shri Ram Mandir: अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा मुहूर्त ठरला..!

Ram Mandir | असे असतील पूजाविधी

राम मंदिराच्या प्रतिष्ठापणा सोहळा हा येत्या २२ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी आजपासूनच विधीपूजन सुरू झाले आहे. आज दशविधी स्नान व विष्णू पूजन होईल त्यानंतर १७ जानेवारी रोजी शोभायात्रा निघेल. शरयू नदीचं पाणी हे मंदिरात आणलं जाईल. १८ जानेवारी रोजी गणेश-अंबिका पूजन तसेच वास्तूपूजन होईल. १९ जानेवारी रोजी अग्नी व नवग्रह पूजा होईल. त्यानंतर २० जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहाला शरयू नदीच्या पाण्याचं स्वच्छ करण्यात येईल. २१ जानेवारी रोजी १२५ कळसांच्या पाण्याने रामलल्लांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात येईल. आणि २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठेला सुरूवात होईल.(Ram Mandir)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here