Ram Mandir | जे भाजपला नाही जमले ते ठाकरेंनी करून दाखवले

0
26
Ram Mandir
Ram Mandir

Ram Mandir |  येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा आणि राम लल्लाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या उत्सवासाठी देशासह राज्यभरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच अन्य क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. दरम्यान, यामुळे ते २२ जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन याठिकाणी आरती व पूजाविधी करणार आहेत. तसेच काळाराम मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, यासाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (Ram Mandir)

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधान सांगताय की, २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी झाली पाहिजे. २२ जानेवारीला दिवाळी साजरी जरूर करावी. पण त्यानंतर जे दिवाळं निघेल त्यावर सुद्धा चर्चा करावी. मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही” अशी बोचरी टीका यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. (Ram Mandir)

Ayodhya | शिंदे सरकारने घेतले हे ‘आठ’ मोठे निर्णय

राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान

त्यावेळी कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर हे उभं राहिलंच नसतं. अयोध्येत राम मंदिर ज्यावेळी निर्माण झालेलं नव्हतं. तेव्हा आम्ही तिथे दोन वेळेस गेलो होतो. मी स्वतः अयोध्येमध्ये शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. तसेच यापुढेही जेव्हा जेव्हा मला अयोध्याला जावं वाटेल तेव्हा तेव्हा मी जाईलच, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, मी कडवट हिंदुत्ववादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने काय केले आणि राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान काय हे सर्वांना माहिती आहे. आम्ही २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदीरात जाऊन दर्शन घेणार आहोत. यावेळी आम्ही काळाराम मंदीरातील या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आमंत्रण देणार आहोत. (Ram Mandir)

Shri Ram Mandir: अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा मुहूर्त ठरला..!

Ram Mandir | राष्ट्रपतींना आमंत्रण – 

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रपतींनाही अयोध्येत आमंत्रित करावं. आम्ही २२ तारखेला काळाराम मंदिरात आरती करणार आहोत. त्यावेळी राष्ट्रपतींनी तेथे उपस्थित असावं, अशी मागणी करत असल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नाशिकला आम्ही काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत, त्याठिकाणी आमी जो कार्यक्रम करत आहोत. त्यासाठीही आमचे खासदार हे राष्ट्रपतींना रीतसर निमंत्रण देतील. राष्ट्रपती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आमची मागणी असल्याचेही ठाकरेंनी सांगितले. (Ram Mandir)

मी देशभक्त, अंधभक्त नाही!

मी स्वतः एक देशभक्त आहे, अंधभक्त नाही. त्यावेळी कारसेवकांनी ते धाडस केलं नसतं, तर आजचं हे राम मंदिर झालंच नसतं. हे झेंडे लावायला अनेकजण येतील पण ज्यावेळी लढण्याची वेळ होती. तेव्हा तुम्ही सर्व कुठे होतात? त्यावेळी शिवसेनेचीच ही घोषणा होती की, “पहले मंदिर, फिर सरकार” आणि मी अयोध्येला जाणार हे नक्की. राम मंदिर हे कुणाची खासगी मालमत्ता नाहीये. ज्यावेळी माझ्या मनात येईल. त्यावेळी मी अयोध्येला राम मंदिरात जाईल, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. (Ram Mandir)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here