कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन; त्यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

0
2

मुंबई : आपल्या मिमिक्रीने प्रेक्षकांना हसवणारे स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. ते ५८ वर्षांचे होते. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राजू श्रीवास्तव हे १० ऑगस्टला एका जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता व जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले व राजू यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. पण यानंतर राजू श्रीवास्तव हे गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत होते. यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आले होते. अखेर आज राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते, ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव यांनी यापूर्वी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये. त्यांचे ‘गजोधर भैया’ हे प्रचलित पात्र आजही अनेकांच्या लक्षात आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here