Raj Thackeray | लोकसभेला महायुतीसोबत जाण्यामागील ‘राजं’कारण काय? राज ठाकरेंनी केला खुलासा

0
40
#image_title

Raj Thackeray | विधानसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून निकालानंतर यावर्षी मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असा विश्वास राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून यापूर्वीच बोलून दाखवला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यातच राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला असून मुंबईतील माहीम मतदारसंघात त्यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांनाही विधानसभेच्या महासंग्रामात उतरवले आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक रंगतदार होणार यात शंका नाही. अशातच राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “मी भाजपसोबत कम्फर्टेबल आहे.” असे विधान केले आहे. त्याआधी त्यांनी पार्श्वभूमी समजावून सांगत भाजपच्या जुन्या दिग्गज व काही दिवंगत नेत्यांची नावे घेत, माझे त्यांच्यापासून भाजप नेत्यांशी जवळचे संबंध राहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Raj Thackeray | ‘उद्या महायुतीला गरज लागू शकते…’; राज ठाकरेंच्या वक्तव्याने वेधले लक्ष!

काय म्हणाले राज ठाकरे? 

यावेळी लोकसभा निवडणूकीत मनसेने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. परंतु विधानसभेला तुम्ही हे गणित जुळवून नाही? असा सवाल विचारला असता, त्यांनी “मी लोकसभेसाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण विधानसभेला आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे अगोदर स्पष्ट केले होते.” असे सांगितले.

भाजपासोबत एक कम्फर्ट झोन आहे

पुढे बोलत, “महायुतीला मनसेची गरज लागू शकते” असेही विधान राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात बोलताना त्यांनी, “सध्याचे वातावरण तसं असल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार हे आमच्या पाठिंब्याविना स्थापन होऊ शकणार नाही. जर विषय भाजपचा असेल तर सुरुवातीपासूनच म्हणजे मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हापासून ते माझा पक्ष काढल्यानंतरही माझे जर कोणाशी चांगले संबंध राहिले असतील तर ते भाजपासोबत होते.

Raj Thackeray | ‘शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांची प्रॉपर्टी’; उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंना लक्ष करत राज ठाकरेंनी साधला निशाणा

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी असतील किंवा अटलजी असतील अडवाणी असतील या सर्वच नेत्यांसोबत सुरुवातीपासूनच संबंध होते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कधी जवळचे संबंध आले नाहीत. त्यामुळे आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असतो मला वाटतं भाजपासोबत मी पहिल्यापासूनच कम्फर्टेबल आहे. त्यांच्यासोबत मी चर्चा करू शकतो. माझा पक्ष हा महायुती बरोबरचा पक्ष आहे. भाजपासोबत एक कम्फर्ट झोन आहे.” असे म्हटले. तसेच, “काँग्रेसमधील नेते एकमेकांसोबत देखील चर्चा करत असतील असं वाटत नाही.” असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here