Nashik News | नाशकात युती व आघाडीतील वाद चिघळला, कार्यकर्त्यांमध्ये राडा; सुप्रिया सुळेंची सभा रद्द

0
63
#image_title

Nashik News | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता काहीच दिवस शिल्लक असून राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून अशातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतील वाद चिघळला असून महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

Nashik News | नाशकात लाचलुचपत विभागाची लष्कराच्या सीडीए कार्यालयावर छापेमारी

भाजपाचा रॅलीत विरोधकांकडून पैशांचे वाटप

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून नाशिक पूर्व मतदार संघ चर्चेत राहीला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा संधी देत उमेदवारी जाहीर केली. असून मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गणेश गीतेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. याआधी या मतदारसंघात डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप गणेश गीते यांच्याकडून करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आज भाजपच्या रॅलीत गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैशांचे वाटप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांच्या इथे पोहोचले असून दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी गणेश गीते यांचे बंधू व पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते यांच्या गाडीवर त्रिकोणी बंगला, पंचवटी, अमृतधाम, येथे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आमच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला असून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.

Nashik News | निवडणूक विभागात कर्मचारी नेमणुकीत गोंधळ; शिपाई कर्मचाऱ्याची केंद्राध्यक्ष पदी नेमणूक

सुप्रिया सुळेंची सभा रद्द

तर आज नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून आपली सभा रद्द करून त्या नाशिक पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या आहेत. “ही खूपच चिंताजनक बाब आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे. आता मी पहिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. आमच्या कुटुंबातील माणसांवर असे हल्ले होणार असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन काय करत आहे?” असा सवाल हे त्यांनी यावेळी केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here