द पॉईंट नाऊ: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मंगळवारपासून सलग पाच दिवस विदर्भ दौरा करणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या विदर्भ मोहिमेची सांगता नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे बैठका घेऊन करणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्सप्रेस ने निघाले असून आज सकाळी साडेआठच्या दरम्यान नागपुरात दाखल झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून घोषणाबाजी करून जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केले.
राज ठाकरे आज संघटनात्मक बांधणीचा आढावा घेऊन नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका ही घेणार आहेत. याशिवाय या दौऱ्यात ते अनेक मान्यवरांच्या गाठीभेटीही घेतील.
नागपूरच्या मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे पोस्टर आणि बॅनर्स लावून स्वागत
राज ठाकरे नागपूरमध्ये दाखल होण्यापूर्वी रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि रेल्वे स्थानकापासून राज ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलपर्यंत मनसेकडून मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोस्टर आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. हिंदू जननायक राज ठाकरे यांचे संत्रा नगरीत स्वागत अशा आशयाने राज ठाकरे यांना हिंदू जननायक असे संबोधन करणारे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. आज नागपूर मध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. ते रविभवनात आज मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
राज ठाकरेंचं ‘मोहीम विदर्भ’
राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी आजपासून 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ११ वाजता ते रवी भवन सर्किट हाऊसवर नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठका करतील.
१९ सप्टेंबर- राज ठाकरेंची पत्रकार परिषद आणि गाठीभेटी झाल्यानंतर पुढे दुपारी २ वाजता ते चंद्रपूरकडे रवाना होतील. चंद्रपुरातही त्यांचं जल्लोषात स्वागत होणार असून इतर विभागवार बैठका होतील.
२०,२१ सप्टेंबर- अमरावतीत विभागवार बैठका होतील.
२२ सप्टेंबर- तारखेला राज ठाकरे मुंबईत परततील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम