Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं

0
44
Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई:  लोकसभा निवणुकीदरम्यान अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे मनसे आणि राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. मात्र, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला. यामुळे मनसे आगामी निवणुका या स्वबळावर लढवणार का..? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान, आज मनसेची (MNS)महत्त्वाची बैठक पार पडली असून, यात राज ठाकरेंनी आपण विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार..? याबाबत घोषणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ठाकरेंवरही तोफ डागली. मी कोणाकडेही काहीही जागा मागायला जाणार नसून, आपण २०० ते २२५ विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024)  जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केले.

Raj Thackeray | महायुतीत बिनसलं; राज ठाकरे विधासभेपूर्वी भाजपला देणार मोठा धक्का..?

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या ‘राज’गर्जनेमुळे मनसे (MNS) नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यामुळे राज ठाकरे स्वबळावर निवणूक लढवणार का..? आणि मनसे खरच २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवणार का..?  (Vidhan Sabha Election 2024) मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहतील का..?, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. (Raj Thackeray)

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मराठी माणसाचे

तसेच यावेळी ठाकरे गटावर टिका करताना ते म्हणाले की,”या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झालेले मतदान हे मराठी माणसाचे नसून, जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे. तर, उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधातील मतं आहेत. त्यामुळे आता जनता मनसेची आपली वाट बघत आहे. विधानसभेसाठीचे महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलेले नाही आणि मी काय  कोणाकडे जागा मागण्यासाठीही जाणार नाही. तर, आपण विधानसभेला २०० ते २२५ जागांवर लढवण्याची तयारी करत असल्याचेही यावेळी राज ठाकरेंनी जहाइर केले. त्यामुळे राज ठाकरे आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर जाहीर सभा

Raj Thackeray | युती आघाडीकडे लक्ष देऊ नका

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्तास स्वबळाचा नारा दिला असून, राज्यातील सर्वच जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि नेत्यांना आदेश दिले आहेत. तसेच विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी ज्या टीम असतील त्याबाबत तुम्हाला सांगण्यात येणार नसून, ते त्यांचे काम करतील व आम्हाला रिपोर्ट देतील.  विधानसभेला आपल्याकडून जे उमेदवार दिले जातील ते पारदर्शक आणि पक्षाशी प्रामाणिक असलेले असतील. एक महिन्यानंतर संपूर्ण राज्यातील मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा बैठक होईल. तसेच युती आघाडीकडे लक्ष देऊ नका. पक्ष वाढवण्यासाठीच्या सूचना यावेळी राज ठाकरे यांनी दिल्या. (Raj Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here