Rain alert: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकटाच वादळ…!

0
3

Rain alert : राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाचे सत्र काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग सह इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अवकाळी पावसाच संकट सतत येत आहे. तर गारपिटीचा संकट अजूनही टळलेलं नाहीये. गेल्या आठवड्यात नाशिकसह आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता तर काही ठिकाणी गारपीटही झाली होती. या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, केळी, हरभरा आणि गहू यांसह नगदी पीके आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या मुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. (Rain alert )

राज्यात गेल्या आठवड्या ही अवकाळी पाऊस आला होता. त्या मुळे आठ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे काही ठिकाणी गारपीठ देखील झाली होती. या अवकाळी पाऊस मुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळे द्राक्षचे मोठ्या प्रमाणात दर कोसळले आहे.

यामध्ये गव्हाची स्थितीही चिंताजनक जाली असून कांद्यावर करपा रोग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे . असे असतांना शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकटांचे वादळ निर्माण झाले दिसून येत आहे. उद्यापासून ते पुढील तीन दिवस 13 जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आला आहे.

आधीच अस्मानी संकट आणि सुलतानी संकटाने शेतकरी गाभरलेले असताना आता पुन्हा एकदा गारपिटीचा पाऊस येणार असल्याने हातात आलेला घास कायमचा मातीमोल होणार आहे. त्यामुळे यावर्षी खरीप आणि रब्बी अशी दोन्हीही पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाणार हे जवळपास निश्चित जालेले दिसून येत आहे.

Deola PI: अर्ध्या रात्री फोन करा मी तुमच्या सेवेत असेन – बारवकर

पुढील तीन दिवस 15 ते 17 या दरम्यान राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असून हाती असलेलं पीक कसं वाचवायचं असा यक्ष प्रश्न अनेक शेतकरी समोर उभा राहिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण जलेला असून त्यामुळे देशातील काही राज्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा काही भाग असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार अस पाहायला येऊ शकते . पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहे.

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका वर्तविला जात आहे . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस हे चिंतेचे असणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here