Prajwal Revanna | देशाच्या माजी पंतप्रधानांच्या नातवावर त्याच्याच घरात काम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकमधील हासनचा JDS खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर हे आरोप करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात सुरू असलेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणी त्याचे काही अश्लील व्हिडिओदेखील व्हायरल होत आहेत. तर, या प्रकरणी रविवारी प्रज्वल रेवन्नाच्या विरोधात होलेनरासीपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Prajwal Revanna)
खासदार प्रज्वल रेवन्नाच्या अडचणी वाढ होत चालली असून, या कथित व्हायरल अश्लील व्हिडिओच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय SIT देखील स्थापन करण्यात आले आहे. या SIT च नेतृत्व एडीजी (CID) विजय कुमार सिंह करत असून, सुमन डी. पेनेकर (DG, CID) आणि मैसुरुच्या आयपीएस सीमा लाटकर या अन्य दोन अन्य सदस्यही या एसआयटीमध्ये आहेत. हासन लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झालं असून, येथून प्रज्वल रेवन्ना हे NDA चे उमेदवार आहे. तर, त्याच्याविरोधात माजी मंत्री जी पुट्टस्वामी गौडा यांचे नातू श्रेयस एम पटेल हे उभे आहेत. (Prajwal Revanna)
Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार
Prajwal Revanna | कोणत्या कलमांतर्गत गुन्हा..?
दरम्यान, प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी एक कथित व्हिडिओही व्हायरल होत आहे. रविवारी त्याच्या विरुद्ध होलेनरासीपुर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 354 A (लैंगिक शोषण), 354 D (पाठलाग करणे), 506 (आपराधिक धमकी) आणि 509 या कलमांतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या पीडित महिलेने रेवन्ना याच्यावर गंभीर आरोप केले असून, नोकरीवर रूजू झाल्यावर चार महिन्यानंतर रेवन्नाने आपले लैंगिक शोषण सुरु केलं. माझ्या आणि माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या जीवाला धोका आहे असे आरोप पीडितेने केले आहे. (Prajwal Revanna)
Rape Case | फूस लावत घरी बोलावले अन्..; मित्रांसह प्रेयसीवर अत्याचार
रेवन्ना देशाबाहेर पळून गेला?
दरम्यान, याबाबत एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर “माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न असल्याचं” स्पष्टीकरण रेवन्नाकडून देण्यात आलं आहे. या प्रकरणी शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी या कथित अश्लील व्हिडिओचा तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्याबाबत घोषणा केली. यानंतर रेवन्ना हा देशाबाहेर जर्मनीला पळून गेल्याच्या चर्चा सुरू आहे. (Prajwal Revanna)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम