Sanjay Shirsat | महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून सत्ता स्थापनेमध्ये तिढा निर्माण झाल्याची माहिती आहे. अशातच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी देखील “उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्री पद मिळाले पाहिजे.” असे म्हटले आहे. “शिवाय एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत. ते महाराष्ट्रातच राहतील. परंतु ते काय निर्णय घेतात हे दोन दिवसांमध्ये कळेल.” असे म्हटले आहे.
विरोधकांवर साधला निशाणा
आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय शिरसाठ यांनी 5 तारखेला 5 वाजता सरकार येणार आहे. लग्नाची घटीका समीप आली असून या लग्नाला काही वऱ्हाडी नाचण्याच्या तयारीत आहेत. म्हणून टीका करत आहेत. आझाद मैदानावर मोठा इव्हेंट होणार आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील आमंत्रण आहे. हा योग त्यांच्या नशिबी आला आहे. त्यांनी ही सुवर्णसंधी घालवू नये.” अस म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
संजय राऊतांना दिला इशारा
पुढे बोलत, “संजय राऊत हे धोबी का कुत्ता…न घर का ना घाट का हा साप रोज सगळ्यांना डसतो. राज्यसभेचा सदस्य होण्याकरिता संजय राऊत शिंदे साहेबांच्या हाता पाया पडत होते. त्यामुळे त्यांनी दाढीला हलक्यात घेऊ नये…..त्यांनी दाढीवरून हात फिरवला तर डम्पिंग ग्राउंड वर बसायची वेळ येईल. यांना राज्यसभेमध्ये पाठवनं ही चूक होती. त्यापेक्षा संजय सावंत यांना पाठवायला हवं होतं.” असं म्हणत त्यांनी संजय रावतांना इशारा दिला आहे.
Sanjay Shirsat | “ते पावसात भिजतायत, आम्हालाही शॉवर लाऊन भाषणं करावी लागतील; शिंदे गटाचा सणसणीत टोला
त्याचबरोबर, “एकनाथ शिंदे हे सोमवारी वर्षा निवासस्थानी जाणार असून तिथे फडणवीस व पवारांशी भेट होईल. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. अमित शहा यांच्याशी देखील संवाद होईल. शिंदे साहेबांना सगळे अधिकार आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे.” असे देखील यावेळी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम