Mohan Bhagwat | ‘बांगलादेशप्रमाणे भारताला ही धोका’; सरसंघचालक मोहन भागवतांचे देशातील हिंदूंना आवाहन

0
43
#image_title

Mohan Bhagwat | नागपुरात विजयादशमीनिमित्त झालेल्या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सध्याच्या घडामोडींचा आधार घेत हिंदू समाजाला ‘दुर्बलता हा अपराध’ असल्याचे सांगत ही बाब हिंदूंनी लवकरात लवकर लक्षात घ्यावी. असे आवाहन केले आहे. सध्या बांगलादेशात होत असलेल्या हिंसक घटना आणि हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांवरून हिंदू समाजाला लक्ष करत दुर्बलता ही हिंदू समाजातसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. सरसंघचालक मोहन भागवतांनी विजयादशमीच्या उत्सवात शेजारील बांगलादेशातील हिंसाचारावर तीव्र प्रतिक्रिया देत सध्या बांगलादेशात सुरू असलेल्या उद्रेकावर त्यांनी भाष्य केले. या परिस्थितीमागील तात्कालीन कारण काही असो, परंतु ही प्रतिक्रिया एकाएकी घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. तेथील धर्मांधांनी त्यांचा राग हिंदू समाजावर काढला, त्यांच्यावर अत्याचार केले, हिंदूच नव्हे तर इतर अल्पसंख्यांकांवरही हल्ले केले. परंतु तेथील हिंदू एकत्रित आले व संघटनेतून त्यांनी या अन्यायाला वाचा फोडली.

मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरातील RSS मुख्यालयात ध्वजारोहण; आत्मनिर्भर होण्याचा हल्ला

बांगलादेशाप्रमाणे भारताला ही धोका

यावेळी बोलताना त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केले असून दुर्बलता हा अपराध आहे. दुर्बलता म्हणजे अत्याचाराला निमंत्रण देणे त्यामुळे हिंदू समाजाने संघटन करणे आवश्यक आहे. सशक्त राहावे. केवळ बांगलादेशातच नाही तर भारतात पण हा धोका असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. देशात समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असून फुटीरता आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असे सांगत ते ओळखण्याचे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

RSS | बहुजन समाजाचं खच्चीकरण करण्याचा संघाचा प्रयत्न; शाहू, फुले, आंबेडकरवादी संघटनांचा आरोप

एकत्रततेलात सुरुंग लावण्याचे काम सुरू

जगात सध्या समोरासमोर युद्ध करणे सोपे नसल्याचे सांगत त्यांनी अनेक देशात फुटीरतावाद फोफावत असल्याचे स्पष्ट केले. समाजात जातीत धर्मात वेगवेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वकरीत्या केला जात आहे. विविधतेत एकत्रतेच्या मंत्राला सुरुंग लावून विविधतेला वेगळेपणाला खत पाणी घालण्याचे प्रयत्न सुरू असून आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. या विचारांना हवा देण्याचे काम केले जात आहे असे आरोप त्यांनी यावेळी केले. छोट्या-छोट्या गोष्टींना अति महत्व देत समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न बाहेरील शक्ती करत असल्याचा धोका त्यांनी यावेळी बोलून दाखवला असून मुद्दामून संघर्ष निर्माण करण्यात येत आहे. हा धोका लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी हिंदूंना केले असून बांगलादेशातील हिंदूंना मदत करण्याचे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आवाहन सरकारला केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here